Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

‘प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’; राजकुमार राव आणि मराठी मुलगा ललित प्रभाकरची प्रभावी कामगिरी!

Xtreme Today   17-10-2026 20:03:54   9878737

‘प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’; राजकुमार राव आणि मराठी मुलगा ललित प्रभाकरची प्रभावी कामगिरी!

 

मुंबई (चित्रपट प्रतिनिधी) - ‘प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा सिनेमा 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळतंय. या सिनेमात राजकुमार रावनं उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. तसेच मराठी अभिनेता ललित प्रभाकरनं अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी ललितचं कौतुक केलं असून ते ललितला ओळखत नव्हते, असं त्यांनी म्हटलं आहे. 

 

एका मुलाखतीदरम्यान, ललित प्रभाकरला सगळे मराठी लोक ओळखतात. जेव्हा तुम्हाला कळलं की ललित कसाबची भूमिका करत आहे. तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? असं विचारलं असता उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘सॉरी पण मी ललितलाही ओळखत नव्हतो. राजकुमार रावलाही ओळखत नव्हतो, पण जेव्हा मी अजमल कसाब म्हणून पाहिलं ना तेव्हा त्याचा अभिनय खूप छान वाटला. अजमल कसाबची हसण्याची पद्धत, त्याची नजर अगदी हुबेहूब केलं आहे. कारण मी कसाबला रोज बघायचो.’ ‘ललितचं आता मी त्याच्या तोंडावर कौतुक करत नाही. पण, ललितला चित्रपटात कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर दोन थोबाडीत माराव्याशा वाटतात इतकं उत्कृष्ट काम केलं आहे.’ असंही उज्ज्वल निकम पुढे म्हणाले. याच मुलाखतीत ललितही पुढे म्हणाला की, ‘ही खूपच मोठी पावती आहे, पण यामागे पूर्ण टीमचं कौतुक आहे. मला लोक मी विविध भूमिका साकारू शकतो या नजरेतून बघतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला त्यांनी टाईपकास्ट नाही केलंय अजून आणि मलाही तसं होऊ द्यायचं नाहीये त्यामुळे हे त्यांचं कौतुक आहे, पण अशा जबाबदारीसाठी मी तयार आहे.’

 

कसाबच्या भूमिकेबद्दल बोलताना ललित म्हणाला की, ‘थोडं काम करावं लागलं. हिंदी पंजाबी उर्दू यावर थोडंसं काम केलं. व्हिडिओमधून कल्पना करुन, आता हे संवाद तो कसा बोलेल, तो काही शब्द वारंवार वापरायचा अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या.’ ‘पुढारी‘ला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम आणि ललित प्रभाकर बोलत होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती