सन २०२५ चे चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव तसेच विशेष योगदान पुरस्कार जाहीर; प्रसाद ओकच्या शिरपेचात मानाचा तुरा, हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान, राणी मुखर्जी यांचाही होणार सन्मान
Xtreme Today
29-07-2026 22:02:26
27514748
सन २०२५ चे चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव तसेच विशेष योगदान पुरस्कार जाहीर; प्रसाद ओकच्या शिरपेचात मानाचा तुरा, हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान, राणी मुखर्जी यांचाही होणार सन्मान
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माते प्रसाद ओक, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा विविध पुरस्कारांसाठी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन आदी विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करून चित्रपटसृष्टीच्या समृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं २०२५च्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्श हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला असून अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओकला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जीची राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.