xtreme2day 30-04-2026 21:17:43 67590631
रितेश देशमुख याचा नवा चित्रपट ‘राजा शिवाजी’ मराठीतील सर्वात मोठी बॉक्स ओपनिंग ठरणार! मुंबई (चित्रपट प्रतिनिधी) - अभिनेता रितेश देशमुख यांचा नवा चित्रपट राजा शिवाजी इतिहास रचण्यासाठी तयार आहे. शुक्रवार १ मे रोजी 'राजा शिवाजी'ची हिंदी आणि मराठी आवृत्ती रिलीज होत आहे.मराठी सिनेमाच्या इतिहासात नवा चॅप्टर सुरु होऊ घातला आहे.'राजा शिवाजी' मराठी सिनेमातील सर्वात मोठी बॉक्स ओपनिंग ठरणार आहे. मराठीतील बिगेस्ट एडव्हान्स ओपनिंग म्ह्णून या सिनेमाचे एक लाख तिकीटांची आगाऊ विक्री केली आहे. ‘राजा शिवाजी’ मराठी सिनेमा नवा किर्तीमान रचण्याच्या बेतात आहे. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘राजा शिवाजी’ मराठी फिल्स इंडस्ट्रीजमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी रिलीज होत असून या चित्रपटाला ८ कोटीची ओपनिंग करण्यासाठी तयार आहे. ही मराठी इंडस्ट्रीतील सर्वात मोठी ओपनिंग म्हटली जात आहे. रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या प्रोडक्शन हाऊसने मुंबई फिल्म कंपनीमार्फत मराठीत तीन चित्रपट तयार केले आहेत. राजा शिवाजी हा या कंपनीचा चौथा चित्रपट आहे.या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजाचे प्रमुख कॅरेक्टर साकारत आहे. विजापूरच्या सुल्तान अफजल खान यांच्या रोलमध्ये संजय दत्त त्याच्या समोर आहे. राजा शिवाजी चित्रपटात अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान आणि बोमन इराणी यांच्या सारखे नामी गिरामी अभिनेते यात आहेत. तर सलमान खान यात कॅमिओ करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार गुरुवारी दुपारपर्यंत राजा शिवाजीसाठी सुमारे ९९ हजार तिकीटांची आगाऊ बुकींग झाली आहे. यामुळे बुकींगमुळे राजा शिवाजीला एडव्हान्समध्येच २.५ कोटींहून अधिक ग्रॉस कलेक्शन मिळाले आहे. ब्लॉक सीट्ससोबत हा आकडा ४ कोटींच्या अत्यंत जवळ आहे. तिकीट बुकींग प्लॅटफॉर्म बुक माय शोवर राजा शिवाजीची सुमारे ४ हजार तिकीटे दर तासाला बुक होत आहेत. त्यामुळे रात्रीपर्यंत एकूण आगाऊ बुकींग तिकीटांचा आकडा एक लाखाच्याही पुढे जाईल. आणि राजा शिवाजीची एडव्हान्स बुकींग ग्रॉस, विना ब्लॉक सीट्सचे कलेक्शन तीन कोटी पुढे जाईल असे म्हटले जात आहे. रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या प्रोडक्शन हाऊसने मुंबई फिल्म कंपनीमार्फत मराठीत तीन चित्रपट तयार केले आहेत. राजा शिवाजी हा या कंपनीचा चौथा चित्रपट आहे.या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजाचे प्रमुख कॅरेक्टर साकारत आहे. विजापूरच्या सुल्तान अफजल खान यांच्या रोलमध्ये संजय दत्त त्याच्या समोर आहे. राजा शिवाजी चित्रपटात अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान आणि बोमन इराणी यांच्या सारखे नामी गिरामी अभिनेते यात आहेत. तर सलमान खान यात कॅमिओ करत आहे. पॅन इंडिया चित्रपटासारखा ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला रिलीज केले जात आहे, राजा शिवाजी हिंदी आणि मराठीत रिलीजसाठी तयार आहे. १०० कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेला राजा शिवाजी महागडा मराठी चित्रपट ठरला आहे. मात्र, या चित्रपटाला मिळालेली एडव्हान्स बुकींग सांगते की हा चित्रपट केवळ बजेट रिकव्हर करणार नाही, तर सर्वात मोठी हिट बनण्याच्या तयारीत आहे. राजा शिवाजीच्या एडव्हान्स बुकींगवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की याची ओपनिंग ८ कोटींच्या आसपास आरामात जाऊ शकते. याआधी कोणत्याही मराठी चित्रपटाला ५ कोटी नेट ओपनिंग मिळालेली नाही. सैराट आणि टाईमपास या चित्रपटाला २ आणि ३.६० कोटींची आतापर्यंत सर्वात मोठी ओपनिंग मिळालेली आहे. राजा शिवाजी जरी अंदाजापेक्षा थोडी कमजोर जरी ओपनिंग मिळाली तरी हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीतील सर्वात मोठा ओपनिंगचा रेकॉर्ड सहज बनवेल. जर या चित्रपटाचा जनतेचा वर्ड ऑफ माऊथ जर पॉझिटीव्ह राहिला आणि प्रेक्षकांचा मराठा इतिहासाशी संबंधित पीरिएड ड्रामा पाहण्याच्या फिलिंगने उसळी खाल्ली तर राजा शिवाजी १० कोटींचा आकडा देखील पार करु शकते. आता मे महिन्याची सुरुवात मराठी सिनेमासाठी कशी राहते ? कोणता नवा लँडमार्क घेऊन येते हे काळच ठरवेल.
drji8c
gkaa46
rtmqjm
sh0vfy
hd85ao
tc2mzz
2cfw30
tlknu5
v4y9k0
pa8g4c
e8g485
r94v18
06vb55
z3ylpk