Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

'धुरंधर 2' ने पहिल्याच वीकेंडला 300कोटींचा गल्ला जमवत 'KGF २' चा मोडला विक्रम! दाऊद इब्राहिम नक्की कुठे आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर!!

xtreme2day   21-03-2026 21:50:17   98433799

'धुरंधर 2' ने पहिल्याच वीकेंडला 300कोटींचा गल्ला जमवत 'KGF २' चा मोडला विक्रम! दाऊद इब्राहिम नक्की कुठे आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर!! 

 

 

मुंबई (चित्रपट प्रतिनिधी) -  'धुरंधर 2: द रिव्हेंज'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आपल्या पहिल्याच वीकेंडमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'KGF: Chapter 2' सारख्या मेगाब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे, अद्याप डब व्हर्जन प्रदर्शित न होताही या चित्रपटाने जगभरात 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.  'KGF 2' ने पहिल्या वीकेंडला 264 कोटी रुपये कमावले होते, तिथे 'धुरंधर 2' ने त्याहून मोठी झेप घेतली आहे.

 

तांत्रिक आणि सेन्सॉर कारणांमुळे हा चित्रपट अद्याप इतर भाषांत डब होऊन प्रदर्शित झालेला नाही. तरीही केवळ मूळ भाषेतील कमाईने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. 21,728 शोज्‌मध्ये 50 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली. हिंदी व्हर्जनने सर्वाधिक कमाई केली असून दक्षिण भारतातही चित्रपटाला पसंती मिळत आहे.  परदेशातही या चित्रपटाने 64 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. 

 

ट्रेड ॲनालिस्ट्सच्या मते, रणवीर सिंहचा जबरदस्त स्टार पॉवर, आदित्य धरचे दिग्दर्शन आणि चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्समुळे प्रेक्षक थिएटरकडे खेचले जात आहेत. पहिल्या भागाच्या तुलनेत या चित्रपटाने 138.5% जास्त ओपनिंग घेतली आहे. दिग्दर्शक आदित्य धरने म्हटलं की, प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. ही तर फक्त सुरुवात आहे. या चित्रपटाचे डब व्हर्जन (दाक्षिणात्य भाषांमध्ये) प्रदर्शित झाले की, या चित्रपटाची कमाई 1000 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच प्रवेश करेल, असा विश्वास चित्रपटसृष्टीतील जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

 

दरम्यान, 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम नक्की कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'धुरंधर 2' या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. भारतातून दाऊदचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊदने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने देश सोडला होता. अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही, मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे. दाऊद इब्राहिमचे कनेक्शन केवळ गुन्हेगारी जगापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याचे संबंध अल-कायदा आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या धोकादायक दहशतवादी संघटनांशी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी 2003 मध्ये अमेरिकेने त्याला 'जागतिक दहशतवादी' म्हणून घोषित केले. आजही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या यादीत त्याचे नाव कायम आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
💰 USDT Recovery Fund 2026 Sign In ➸ telegra.ph/Compensations-03-29-3?hs=8a0319e0342e1e1843951681d9b43229& 💰 02-04-2026 10:30:24

r6aalv

xtreme2day.com
💹 BTC Loss Recovery Bonus Ready to Withdraw - telegra.ph/Compensations-03-29-2?hs=8a0319e0342e1e1843951681d9b43229& 💹 04-04-2026 00:55:39

z1pmyh


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती