दुसऱ्यांची सेवा करणे हाच आपला सर्वात मोठा धर्म आहे आणि हीच भारताची खरी ओळख; नवीन पीएमओ कार्यालयाचे नवी दिल्लीत उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
xtreme2day
13-02-2026 23:07:11
21910451
दुसऱ्यांची सेवा करणे हाच आपला सर्वात मोठा धर्म आहे आणि हीच भारताची खरी ओळख; नवीन पीएमओ कार्यालयाचे नवी दिल्लीत उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - दुसऱ्यांची सेवा करणे हाच आपला सर्वात मोठा धर्म आहे आणि हीच भारताची खरी ओळख आहे. आजचा हा दिवस केवळ एका नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा नाही, तर हा दिवस भारताच्या संकल्पशक्तीचा आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याच्या आपल्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे", असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यालयाचे नाव 'सेवा तीर्थ' का ठेवले, याचे कारण सांगितले. मोदी म्हणाले की, अनेकांना प्रश्न पडला असेल की, पंतप्रधान कार्यालयाचे नाव 'सेवा तीर्थ' का ठेवण्यात आले? आपल्या संस्कृतीत म्हटले आहे, 'सेवा परमो धर्मः'. सेवा हीच आमची ओळख आहे आणि हाच भारताचा आत्मा आहे. आजवर आपण ब्रिटीश साम्राज्याचा वारसा सांगणाऱ्या इमारतींमध्ये बसून धोरणे आखली. साउथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक या इमारती भारताला गुलामगिरीच्या साखळदंडात जखडून ठेवण्यासाठी बांधल्या गेल्या होत्या. पण आज, हे 'सेवा तीर्थ' आणि ' कर्तव्य भवन ' १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी समर्पित आहे", असं पंतपधान मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.
अनेकांना प्रश्न पडला असेल की, पंतप्रधान कार्यालयाचे नाव 'सेवा तीर्थ' का ठेवण्यात आले? आपल्या संस्कृतीत म्हटले आहे, 'सेवा परमो धर्मः'. सेवा हीच आमची ओळख आहे आणि हाच भारताचा आत्मा आहे. आजवर आपण ब्रिटीश साम्राज्याचा वारसा सांगणाऱ्या इमारतींमध्ये बसून धोरणे आखली. साउथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक या इमारती भारताला गुलामगिरीच्या साखळदंडात जखडून ठेवण्यासाठी बांधल्या गेल्या होत्या. पण आज, हे 'सेवा तीर्थ' आणि ' कर्तव्य भवन ' १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी समर्पित आहे", असं पंतपधान मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, "२०१४ मध्ये देशाने एक मोठा संकल्प केला होता तो म्हणजे गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायचा. हा केवळ नावाच्या बदलाचा प्रवास नाही, तर हा दृष्टीकोन बदलणारा प्रवास आहे. आम्ही शूरवीरांच्या स्मृतीसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले. पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस स्मारक, ज्या रेसकोर्स रोडवरून सत्तेचा प्रभाव दिसायचा, त्याचे नाव बदलून आम्ही लोककल्याण मार्ग असे नामकरण केले. हा सत्तेच्या अहंकाराला सेवेच्या पवित्र भावनेत बदलण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जुन्या इमारतींशी आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. तिथे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, ज्यांनी देशाला दिशा दिली. तो इतिहास पुसून टाकायचा आमचा उद्देश नाही. म्हणूनच, त्या जुन्या ऐतिहासिक इमारतीचे रूपांतर एका भव्य 'राष्ट्रीय संग्रहालयात' करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना भारताच्या प्रवासाची साक्ष मिळत राहील," असंही यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं.
दरम्यान, "आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत आहोत. नवीन व्यापार करार होत आहेत आणि प्रत्येक भारतीयापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. अशा वेळी, सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन तुमच्या कामाला नवी ऊर्जा देईल. येथील निर्णय कोणत्याही राजा- महाराजांच्या मर्जीवर नव्हे, तर जनतेच्या कल्याणासाठी होत घेतले जातील", असं मोदींनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थवरून आज घेतले
अनेक निर्णय
भारताच्या स्टार्टअप इंडिया या नाविन्यपूर्ण परिसंस्थेला पंतप्रधानांनी 10000 कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0 ला मंजुरी दिली आहे. तसेच लखपती दीदी योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएम राहत योजनेअंतर्गत लखपती दीदींचे उद्दिष्ट दुप्पट करून 6 कोटी करण्यात आले आहे. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून 2 लाख कोटी करण्यात आला. 10 हजार कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधान राहत योजनेला मान्यता दिली आहे. या उपक्रमांतर्गत अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत. यामुळे त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध होणार असल्याने अनेकांचा जीव वाचणार आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून 2 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. भारताची संपूर्ण कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा खर्च 1 लाख कोटी रुपयांवरून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत दुप्पट करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. गेल्या काही दशकांपासून, अनेक मंत्रालये जुन्या कार्यालयांमधून काम करत होती, ज्यामुळे समन्वय समस्या, देखभाल खर्चात वाढ आणि कार्यक्षमता कमी झाली होती. मात्र आता अनेक मंत्रायले नवीन संकुलात हलवण्यात आली आहेत. यामुळे कामे सुलभ होणार आहेत. सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय कार्यक्षमता आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटली अपडेटेड कार्यालये तयार करण्यात आली आहेत. ज्यामुळे सर्वांना फायदा होणार आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.