RSS कोणाच्या विरोधात नाही, आमचे काम संपूर्ण देशासाठी - सरसंघचालक मोहन भागवत
xtreme2day
07-02-2026 23:13:00
358021696
RSS कोणाच्या विरोधात नाही, आमचे काम संपूर्ण देशासाठी - सरसंघचालक मोहन भागवत
(संजय जोशी याजकडून)
मुंबई - भारताचा सनातन स्वभाव कधीच बदलणार नाही. ऋषी-मुनींनी सांगितलेले आहे की सगळे आपलेच आहेत. आपल्याला सगळ्यांना सोबत चालायचे आहे. आपल्याला कोणालाही मागे सोडायचे नाही. एकट्याला राहायचे असेल तर कोणत्याही नियमांची गरज नसते. जेव्हापासून सृष्टी आहे तेव्हापासून धर्म आहे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले.
मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसने संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी संघाची स्थापना, संघाचे उद्दिष्ट, हिंदू धर्म यावर भाष्य केले. याच कार्यक्रमात बोलताना संघाचे काम फारच अनोखे आहे.संपूर्ण जगात संघासारखे काम होत नाही. संघाला समाजाला फक्त संघटित करायचे आहे. या व्यतिरिक्त संघाचे दुसरे कोणतेही काम नाही, असे भागवत म्हणाले.
अनेक लोक म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे आहेत. परंतु मोदी यांचा एक पक्ष आहे. हा पक्ष संघापासून वेगळा आहे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले. संघाला दुसऱ्या संस्थांशी स्पर्धा करायची नाही. कोणाचाही विरोध न करता आम्ही आमचे काम करतो. संघाला लोकप्रियता नको आहे. संघाला सत्ता किंवा ताकदही नको आहे. देशाच्या भल्यासाठी जेवढी कामे होत आहेत ती सर्व कामे व्यवस्थित व्हावीत यासाठी संघ काम करतो. संघात व्यवहार होत नाही. आपुलकीच्या भावनेने संघात सगळे काम होते, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. तसेच, आपण विश्वगुरू होणार आहोत. भारतातील मुस्लीम आण ख्रिश्चन हे भारताचेच आहेत. भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत. पहिला हिंदू हा अभिमानाने आपण हिंदू असल्याचे सांगतो. दुसरा हिंदू हा मी हिंदू आहे तर मग त्यात काय झालं? यात अभिमानाची बाब काय आहे? असे म्हणतो. तिसरा हिंदू हा स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही मला घरात विचाराल तरच मी हिंदू असल्याचे सांगेन असं म्हणतो. चौथा हिंदू हा आपण हिंदू असल्याचेच विसरून गेला आहे. किंवा तो हिंदू असल्याचे त्याला विसरून जाण्यास भाग पाडण्यात आले आहे, असेही मत भागवत यांनी व्यक्त केले.
मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. यावेळी त्यांनी टॅरिफवर आरएसएसची भूमिकाही स्पष्ट केली. टॅरिफच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आपण जगापासून अलिप्त राहू शकत नाही, परंतु जर आपण व्यवहार केले तर आपण ते स्वेच्छेने करू. आपण कोणाच्याही दबावाखाली असे करणार नाही किंवा टॅरिफवर आधारित निर्णय घेणार नाही. आपण जे काही खरेदी करतो ते आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करेल. आपण स्वदेशी स्वीकारले पाहिजे. जिथे परदेशात जाण्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरा पर्याय नाही तिथे परदेशी वस्तू वापरता येतात. धोरण पातळीवर, आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यवहार करावे लागतात. धोरण हळूहळू पुढे जात आहे. धोरण बदलते आणि स्वतःच्या गतीने प्रगती करेल, परंतु देशांतर्गत पातळीवर, आपण स्वदेशी लागू करू.
संघाच्या कामावर बोलताना भागवत म्हणाले की, संघाच काम हे वेगळं काम आहे. पूर्ण जगात असं काम नाही असं आधी आम्ही म्हणायचो, आता आम्ही काम करत असताना देखील अनुभवत आहोत. जगातील लोकं संघाचं काम पहायला येत आहेत. आफ्रिका, अमेरिका, कोरिया या देशातील लोकं म्हणतात तुमच्या कामा प्रमाणे आम्हाला आमच्या देशात युवकांसाठी काम करायचं आहे, आपण आम्हाला ते शिकवाल का? तथागत बुद्धांनंतर असं काम कुणी केलेलं नाही. असं काम करणारा दुसरा कोणी उपलब्धच नाही. आकाश कसं आहे तर आकाशा सारखा आहे दुसर उदाहरण नाही. समुद्र कसा आहे समुद्रा सारखा आहे दुसरं उदाहरण नाही. अगदी असंच संघाचं काम आहे. मोहन भागवत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ‘संघाला इतर पक्ष आहे, विचारधारा यासोबतच जोडू पाहत आहेत ते चुकीच आहे. संघाला वरून आणि लांबून पाहाल तरी सुद्धा गैरसमज निर्माण होतात. संघ कवायती करतो परंतु संघ पॅरामिलिट्री ऑर्गनायझेंशन नाही. संघाचे स्वयंसेवक लाठी काठी शिकतात परंतु ते कोणताही आखाडा नाही. संघ अखिल भारतीय संगीत शाळा नाही संघाचे स्वयंसेवक राजकारणात आहेत मात्र संघ राजकीय पक्ष नाही. काही गोष्टी वरून पाहिल्या की गैरसमज निर्माण होतो त्यामुळे संघाला आतून जाणून घेणे गरजेचे आहे. साखर कशी आहे हे अनुभवायला केवळ एक चमचा साखर खाल्ली तरी कळत साखर कशी आहे. परंतु असं काही खायचं असेल तर त्याची परीक्षा घेणे गरजेचे नाही एवढ तरी कळायला हवं. यामुळे 100 वर्षानंतर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की संघ काय आहे? संघाच काम हे संघासाठी नाही ते संपूर्ण देशासाठी आहे.’
पुढे बोलताना भागवत म्हणाले की,’संघ काय आहे हे जाणून घेण्यासाठी संघ काय नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. संघ दुसऱ्या कोणत्याही संघटनेसोबत स्पर्धा करण्यासाठी निघाला नाही आणि जाणार ही नाही. संघ कोणत्या विशिष्ट परिस्थितीत प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेला नाही. संघ कोणाच्या विरोधात चाललेला नाही. संघच काम कोणाचा ही विरोध न करता काम करत चालत राहणारा आहे. संघाला प्रसिद्धी नको आहे. संघाला ताकद नको आहे. संघ जी देशात चांगली कामे सुरू आहेत ती पूर्ण करण्यासाठी काम करत आहे.’
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.