Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

भारताचा पहिला क्वाण्टम कम्प्युटर लवकरच सेवेत, अमेरिका, चीन पाठोपाठ देशातील मोठे यश

xtreme2day   03-03-2025 10:00:42   20229172

भारताचा पहिला क्वाण्टम कम्प्युटर लवकरच सेवेत, अमेरिका, चीन पाठोपाठ देशातील मोठे यश

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) -सर्वसामान्य लोकांच्या वापरातील कम्प्युटरच्या तुलनेत कैक पटींनी अद्ययावत असलेल्या क्वाण्टम कम्प्युटरच्या निर्मितीत आता भारतानेही प्रवेश केला आहे. देशातील पहिलावहिला सहा क्युबिट्सचा क्वाण्टम कम्प्युटर निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असून टाटा मूलभूत संशोधन संस्था म्हणजेच टीआयएफआरचे शास्त्रज्ञ हा कम्प्युटर तयार करत आहेत.

 

सर्वसामान्य कम्प्युटर बिट्सचा वापर करतात. बिट्समध्ये ० किंवा १ या भाषेत प्रोग्रॅम लिहिले जातात किंवा माहिती साठवली जाते. क्वाण्टम कम्प्युटर हे क्युबिट्सचा वापर करतात. क्युबिट्स एकाच वेळी ० किंवा १ किंवा दोन्ही असू शकते. क्वाण्टम कम्प्युटर हे जटील सिम्युलेशन चालवू शकतात. गणितातील एखादे अत्यंत क्लिष्ट वाटणारे समीकरण किंवा इतर क्लिष्ट प्रणाली या कम्प्युटरद्वारे अगदी झटक्यात सोडवली जाऊ शकते. सामान्य कम्प्युटरला किंवा अगदी शास्त्रीय कम्प्युटरलाही ती सोडवण्यासाठी कैक वर्षे लागू शकतात.

 

हा क्वाण्टम कम्प्युटर तयार करण्यासाठी टीआयएफआरसह भारतातील इतर वैज्ञानिक संस्था काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. गेली १२ वर्षे टीआयएफआरमध्ये हा कम्प्युटर बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे टीआयएफआरमधील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आर. विजयराघवन यांनी सांगितले. आता हा सहा क्युबिटचा क्वाण्टम कम्प्युटर अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारने आता क्वाण्टम मिशन हाती घेतले आहे. क्वाण्टम कम्प्युटिंग, क्वाण्टम कम्युनिकेशन, क्वाण्टम सेन्सिंग आणि क्वाण्टम मटेरियल्स या चार क्षेत्रांसाठी तब्बल चार हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, टीआयएफआरच्या शास्त्रज्ञांनी सहा क्युबिट्स क्वाण्टम कम्प्युटरच्या निर्मितीत प्रवेश केला आहे. केंद्र सरकारने क्वाण्टम मिशनसाठी चार हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. उध्देश्य पुढिल ३ वर्षात २४ क्युबिट्स आणि ५ वर्षात १०० क्युबिट्स क्षमता वाढवणे आहे. क्वाण्टम तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी बदलणार आहेत. या क्षेत्रात भारताने तातडीने आघाडी घेतली नाही, तरी आपण त्या गतीने काम करणे आवश्यक आहे. क्वाण्टम तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काळात अनेक गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे ही सुरुवात आश्वासक आहे, असे डॉ. विजयराघवन यांनी सांगितले. टीआयएफआरतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध शाळा, कॉलेजे आणि सामान्य लोकांना संस्थेत बोलावण्यात आले होते. या वेळी झालेल्या व्याख्यानानंतर त्यांनी ही माहिती दिली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती