Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्रिकेट

वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर यूएईचं लोटांगण; अवघ्या 15 षटकात पूर्ण केलं 249 धावांचं लक्ष्य, भारताचा ऐतिहासिक विजय

Xtreme Today   24-11-2026 18:39:32   790823544

वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर यूएईचं लोटांगण; अवघ्या 15 षटकात पूर्ण केलं 249 धावांचं लक्ष्य, भारताचा ऐतिहासिक विजय

 

मुंबई (क्रीडा प्रतिनिधी) - आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या 11 व्या सामन्यासाठी भारत 'अ' आणि यूएई यांच्यात लढत झाली. यामध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. भारताने यूएई वर 7 विकेट्सने विजय मिळवला. यामध्ये वैभव सुर्यवंशीने वादळी ऐतिहासिक खेळी केल्याचं पाहायला मिळालं. वैभवनं फक्त 52 बॉलमध्ये द्विशतक ठोकलं आहे. त्याच्या खेळीच्या बळावर यूएई संघाने दिलेलं 249 धावांच लक्ष भारतीय संघाने केवळ 14.2 षटकातच पूर्ण केलं आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या 11 व्या सामन्यासाठी भारत 'अ' आणि यूएई यांच्यात लढत झाली. यामध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे.

 

यूएई संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 249 धावांचं लक्ष्य भारतीय संघासमोर दिलं होतं. भारतीय संघासमोर विजयासाठी 250 धावांचं लक्ष होतं. युएईकडून हरप्रीत सिंग भाटियाने 12 चौकार आणि 4 षटकारांसह १३० धावा करत शतक झळकावले. तर भारतीय संघाकडून अर्शद खानने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्यानंतर युएईच्या विकेट्स पडतच राहिल्या. फक्त 2 धावांवर आर्यांश शर्मा बाद झाल्याने संघाला पहिला धक्का बसला. 20 धावांवर अंश टंडन बाद झाला. त्यानंतर हरप्रीत सिंग आणि मोहम्मद शहदाब यांनी तिसऱ्या विकेटसाठी 101 चेंडूंमध्ये 71 धावांची भागीदारी केली. शहादाब 91 धावांवर बाद झाला आणि ही डावातील सर्वोच्च भागीदारी ठरली. शहादाबने 2 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. 

 

मात्र, वैभव सूर्यवंशीने 53 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 28 षटकारांसह 204 धावांची खेळी करून भारत 'अ' संघाला विजय मिळवून दिला. युएईविरुद्धच्या सामन्यात भारताने 250 धावांचे लक्ष्य अवघ्या 14.2 षटकांत पूर्ण करून 7 गडी राखून विजय मिळवला. संघाच्या विजयात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या वैभवने अनेक विक्रम रचले. त्याने ५२ चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले, जे लिस्ट 'अ' क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक आहे. तसेच त्याने 28 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, जे देखील लिस्ट 'अ' क्रिकेटमधील सर्वात जलद शतक आहे. 

 

दरम्यान, भारतानं आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत पहिल्या सामन्यात नेपाळवर मोठा विजय मिळवला होता. तर, पाकिस्तान विरोधातील सामन्यात भारताचा 48 धावांनी पराभव झाला होता. यूएईला नेपाळनं 6 विकेटनं पराभूत केलं होतं. भारतानं यूएईला पराभूत केल्यामुळं 4 गुणांसह उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता उपांत्य फेरीत भारतासमोर बांगलादेश किंवा श्रीलंकेचं आव्हान असेल. उपांत्य फेरीत भारतानं विजय मिळवल्यास अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पुन्हा लढत होऊ शकते. त्यासाठी पाकिस्तानला देखील उपांत्य फेरीचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमने सामने आल्यास टीम इंडियाला ग्रुप स्टेजमीधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती