Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्रिकेट

भारताकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी; फायनल विजयासाठी चार योग जुळून आले

xtreme2day   07-03-2026 22:50:32   173694374

भारताकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी; फायनल विजयासाठी चार योग जुळून आले

 

 

मुंबई (क्रीडा प्रतिनिधी) - टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, विजयासाठी चार योगही जुळून आले आहेत. टीम इंडिया टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदापासून एक विजय दूर आहे. टीम इंडियाचा अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत चार योग जुळून आले आहेत. त्यामुले सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवेल, असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे.

 

दरम्यान, आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीचा विजेता कोण ठरणार हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर गतविजेत्या आणि यजमान टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर करो या मरो सामन्यात मात करत सेमी फायनलमध्ये धडक दिली. त्यानंतर भारताने इंग्लंडवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवून फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड पहिलाच टी 20i वर्ल्ड कप जिंकणार की टीम इंडिया तिसरी ट्रॉफी मिळवणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना आहे.

 

 खरंतर, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला जेव्हा पराभूत केलं आहे तेव्हा भारत चॅम्पियन झाला आहे. 1983 च्या वनडे वर्ल्डकप, 2007 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हा योग जुळून आला होता. आता झिम्बाब्वने या स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. त्यामुळे जेतेपद मिळवेल, अशी आशा क्रीडाप्रेमी बाळगून आहेत. 2011 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने श्रीलंकेला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. तेव्हा भारत हा घरच्या मैदानावर विजयी ठरलेला पहिला संघ ठरला होता. आता कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर टी20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. आता ही संधी भारताकडे आहे. 2011 चा वनडे वर्ल्डकप जिंकण्यापूर्वी भारताला दक्षिण अफ्रिकेकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत तसंच झालं आहे. या स्पर्धेत भारताचा एकमेव पराभव झाला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभूत केलं आहे.

 

 

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारत इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन ठरला आहे. 2022 मध्ये इंग्लंडने भारताला उपांत्य फेरीत हरवलं होतं आणि जेतेपद मिळवलं होतं. तर 2024 मध्ये भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली होती. आताही तसंच झालं आहे. त्यामुळे हा योग जुळून आला तर भारत जेतेपदाचा मानकरी ठरेल.  

 

 

गौतम गंभीर याने टीम इंडियाला 2007 आणि 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. गंभीरने दोन्ही अंतिम सामन्यात निर्णायक खेळी साकारली होती. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणि हेड कोच गौतम गंभीर याच्या मागदर्शनात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडिया आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून एक विजयाने दूर आहे. टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताला इथवर पोहचवण्यात कोचिंग स्टाफने कठोर मेहनत घेतली आहे. जर कोच गंभीरवर सोपवलं तर तो स्वत: पॅड बांधून मैदानात उतरेल. कारण सर्वांना विजयात काही न काही योगदान द्यायचं हा त्यांचा मंत्रा आहे”, असं सूर्या म्हणाला. सूर्याने गंभीर कशाप्रकारे विचार करतो याबाबत पत्रकार परिषदेत भाष्य केलं. गंभीरसाठी दुसऱ्याने केलेली छोटेखानी खेळी ही शतकाच्या बरोबरीची असते, असं सूर्याने सांगितलं.

 

या सामन्यात नाणेफेकीचा कौल आणि खेळपट्टीचा अंदाज महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाल, काळी आणि मिश्र मातीच्या तीन खेळपट्ट्या आहे. प्रत्येक खेळपट्टीचं महत्त्व आहे. अंतिम सामन्यात कोणती खेळपट्टी वापरली जाणार यावरून नाणेफेकीनंतर फलंदाजी की गोलंदाजीचा निर्णय घेतला जाईल. काळ्या मातीची खेळपट्टी सामना सुरू झाल्यानंतर हळू हळू मंदावत जाते. त्यामुळे दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांना मदत होते. लाल मातीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते. कारण या खेळपट्टीवर उसळी मिळते. त्यामुळे या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती