Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर खेळ

कॅलेब, सर्वेश, श्रेयश, शिवांगी, सर्वेक्षा, सानवी, देवयानी, ध्रुविका यांनी पटकावले सुवर्णपदके ; जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न

xtreme2day   05-02-2025 23:54:09   6756924

कॅलेब, सर्वेश, श्रेयश, शिवांगी, सर्वेक्षा, सानवी, देवयानी, ध्रुविका यांनी पटकावले सुवर्णपदके ; जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न

 

छत्रपती संभाजीनगर (क्रीडा प्रतिनिधी) - जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेतर्फे पी.ई.एस. कॉलेजच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात नुकत्याच झालेला जिल्हास्तरीय सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धेत मुलांमध्ये कॅलेब रॉसेल, सर्वेश पिसाळ, श्रेयश झुंबड तर मुलींमध्ये सर्वेक्षा पिसाळ, शिवांगी ढाकणे, सानवी जवळकर, देवयानी मोकाटे व ध्रुविका पवार यांनी आप-आपल्या गटात सुवर्ण कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

 

या स्पर्धेत जिल्हाभरातून ३१६ खेळाडूनी सहभाग घेतला. प्रारंभी, पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी सूर्यवंशी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते अमृता झवर यांनी झेंडा दाखून स्पर्धेचे उद्घाटन केले तर बक्षीस वितरण शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर चाटसे आणि प्राचार्य प्राजक्ता केंद्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे यांची विशेष उपस्थिती होती.

 

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे-

८ वर्षाखालील (मुले): ५० मीटर धावणे: १. कॅलेब रॉसेल, २. युवराज घाईत , ३. प्रतीक कंटूले,  स्टॅंडिंग ब्रोड जंप: १. कॅलेब रॉसेल, २. सोहम राठी, ३. सत्यजित कदम, १०० मीटर धावणे:  १. कॅलेब रॉसेल, २. युवराज घाईत, ३. प्रतिक कंटुले, (मुली): ५० मीटर धावणे: १. सर्वेक्षा पिसाळ, २. तन्वी तुंगणवार, ३. श्रीनिधी पाठक, स्टँडिंग ब्रॉड जंप: १. रोशनी बोराडे, २. सृष्टी पाटोळे, ३. तनवी तुंगणवार, १०० मीटर धावणे: १. सर्वेक्षा पिसाळ, २. स्वरा सुरावार, ३. सनवी क्षीरसागर. १० वर्षाखालील:(मुले)-  ५० मीटर धावणे: १. सर्वेश पिसाळ, २. हर्ष देसरडा, ३. राजू देवकर, १०० मीटर धावणे: १. सर्वेश पिसाळ, २. हर्ष देसरडा,  ३. क्षितिज कोरडे, लॉंग जंप: १. रियांश पाटील, २. रुद्र बिलवाल, ३. राजवीर देवकर, गोळा फेक: १. हिमांशू बागला, २. सोहम चव्हाण, ३. स्वराज वाघ, (मुली)- ५० मीटर धावणे: १. शिवानी ढाकणे, २. ईश्वरी ढगे, ३. स्वरा मोडके, १०० मीटर धावणे: १. शिवांगी ढाकणे, २. ईश्वरी ढगे, ३. श्रेयु हडकर, लॉंग जंप: १. अनुष्का कर्डिले, २. इरा भालसिंग, ३. ऋतुजा जगताप, गोळा फेक: १. श्रेया कोरडेवाड, २. स्वरा दौड, ३. सायली सोनवणे. १२ वर्षाखालील:  (मुले)- ६० मीटर धावणे: १. वेदांत मत्तमवार, २. सय्यद फैजान, ३. अर्णव पालोदकर, ३०० मीटर धावणे: १. सय्यद फैजान, २. अर्णव पालोदकर, ३. वेदांत मत्तमवार, लांब उडी: १. अर्णव पलोडकर, २. ओम चव्हाण, ३. सोम्या भास्करे, गोळा फेक: १. अर्चित बागला, २. अनुज केने, ३. अजिंक्य चव्हाण, (मुली)- ६० मीटर धावणे: १. सानवी जवळकर, २. त्रिशा केंद्रे, ३. हर्षदा मुरकुटे, ३०० मीटर धावणे: १. सनवी जाऊलकर, २. श्रुती चरखा, ३. हर्षदा कुठे, लांब उडी: १. त्रिशा केंद्रे, २. समृद्धी मुंडे, ३. समीक्षा गायके, गोळा फेक: १. मालता गडणे, २. तेजल साबळे, ३. देवयानी ताठे. १४ वर्षाखालील: (मुले)- ८० मीटर धावणे: १. श्रेयश झुंबड, २. अब्दुल खान, ३. श्री भंडारी, ३०० मीटर धावणे: १. श्रेयश झुंबड, २. सायन खान, ३. तनिष इंदोरे, लांब उडी: १. मयंक बैद, २. खुश काबरा, ३. याद्निक हेकडे, गोळा फेक: १. ईशान ननावरे, २. तेजस सूर्यवंशी, ३. पृथ्वीराज मस्के, (मुली)- ८० मीटर धावणे: १. ध्रुविका पवार, २. सिया बिलवाल, ३. श्रुतिका भोकरे, ३०० मीटर धावणे: १. देवयानी मोकाटे, २. सुजाता चाटे, ३. वेदिका खनाळे, लांब उडी: १. ध्रुविका पवार, २. सिया भिलवाल, ३. जानवी जाधव, गोळा फेक: १. देवयानी मोकाटे, २. अंजली केने, ३. दिशा चव्हाण.

 

या सर्व खेळाडूंची २३ फेब्रुवारीला पंढरपूर (जिल्हा: सोलापूर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली असून जिल्हा संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अधिकारी म्हणून डॉ.दयानंद कांबळे, डॉ.सचिन देशमुख, डॉ.राम जाधव, डॉ माधवसिंग इंगळे प्रा.चंद्रशेखर पाटील, डॉ.रंजन बडवणे, प्रा.शशिकला निलवंत, मनीष पहाडिये, जी. सूर्यकांत, शोएब पठाण, महेंद्र मखरे, अर्जुन शिंदे, ओम भुरेवाल, आशिष कागडा, अमृता गायकवाड, दर्शन भुरेवाल, मयुर , आलोक  कटकोरी, मकरंद खेडकर यांनी काम पाहिले.

छायाचित्र - ॲथलेटिक्स स्पर्धेतील विजेत्या खेळाडूं सोबत प्राचार्य डॉ.शिवाजी सूर्यवंशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अमृता झवर, प्राचार्य डॉ.मधुकर चाटसे, प्राचार्य प्राजक्ता केंद्रे, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे, तांत्रिक अधिकारी डॉ.दयानंद कांबळे, क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्य पूनम नवगिरे, डॉ.राम जाधव, प्रा.संजीवनी दिल्लीकर आदि.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती