Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर खेळ

बुद्धिबळ खेळाडूंनी स्पर्धा जिंकण्यासाठी नियमित सरावाबरोबरच रणनीती तयार करून स्पर्धा खेळत जाव्यात ; उत्तम आरोग्य, आत्मविश्वास याची आवश्यकता -राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू, प्रशिक्षक प्रकाश देशपांडे

xtreme2day   10-12-2024 22:24:10   4336797

बुद्धिबळ खेळाडूंनी स्पर्धा जिंकण्यासाठी नियमित सरावाबरोबरच रणनीती तयार करून स्पर्धा खेळत जाव्यात ; उत्तम आरोग्य, आत्मविश्वास याची आवश्यकता -राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू, प्रशिक्षक प्रकाश देशपांडे

 

पुणे (क्रीडा प्रतिनिधी) - "बुद्धिबळ हा खेळ आपल्याला विचार करायला,समस्या सोडवायला आणि रणनीती तयार करायला शिकवतो म्हणून खेळाडूंना स्पर्धा जिंकण्यासाठी नियमित सराव,अभ्यासपूर्ण चाली व आत्मविश्वास याची आवश्यकता" असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू प्रकाश देशपांडे यांनी केले.

पुण्यातील वारजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राजे कॅसल चेस अकॅडमी व बलराज चेस अकॅडमी द्वारा आयोजित बुद्धिबळ स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी प्रशिक्षक अनिल राजे,विलास मोघे,अर्चना राजे ह्यांची मुख्य उपस्थिती होती.

एकूण ५१ खेळाडूंनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.प्रमुख पाहुणे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे,वारजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे व्यवस्थापक योगेश चव्हाण यांचे हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.स्पर्धा यशस्वितेसाठी राजे कॅसल चेस अकॅडमीच्या मुख्य अर्चना राजे,मुख्य प्रशिक्षक अनिल दत्त राजे,मुख्य स्पर्धा संचालक विलास मोघे (बलराज चेस अकॅडमी),स्पर्धा संचालक रेनुक पावडे, निलाक्षी पावडे,आश्विन राजे यांनी प्रयत्न केले.अभिजित कुंटे यांनी सर्व खेळाडूंशी प्रत्यक्ष संवाद साधला व सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.सहा फेऱ्यांमध्ये झालेल्या ह्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये medalist  व नॉन medalist असे दोन विभागात खेळाडूंचे वर्गीकरण करण्यात आले होते.medalist गटामध्ये राघव पावडे हा पाच गुण मिळवून प्रथम आला.तर नॉन medalist विभागात वैदिक भावसार प्रथम आला.

विजेत्यांची नावे -

       Medalist ग्रुप

    ५ गुण

 राघव पावडे विजेता (प्रथम क्रमांक)

    ४ गुण

 विहान आढाव

उपविजेता (द्वितीय क्रमांक)

चतुर्थी परदेशी तृतीय,

    ३.५ गुण

  ओवी पावडे, चतुर्थ

    ३ गुण 

विहान शाह पाचवा

,श्रेयस सरदेशमुख, पार्थ दिवाण,आयुष सर्जेराव,शौनक पाठक,वेदिष साधले.

    २.५ गुण

विराट दोडके,

     २ गुण

लाभ वर्मा, जुई कुलकर्णी,नचिकेत कुलकर्णी,स्वयं मेटी,स्वरा दोडके

     १ गुण

अमर्त्य कुबल,मिहिर दाभाडकर,श्रावणी रघुवंशी

.....non medalists

       ५ गुण 

वैदिक भावसार विजेता( प्रथम क्रमांक)

रियांश चतुर्वेदी द्वितीय क्रमांक

,राजवीर नगराळे तृतीय क्रमांक

श्लोक देकाते,चतुर्थ क्रमांक

        ४ गुण

अबीर सुद पाचवा क्रमांक

 

,श्रावणी राजूरकर,ओजस्वी जोशी,

अन्वेश आढाव,अनुप झांबरे,विवान कुलकर्णी.

      ३.५ गुण

अभिराज शर्मा, रुद्रांश चोर्घे 

       ३ गुण

अनया तरफदार, युवान दास, सोहम राजूरकर,वेध तांबिटकर, तेजस दफ्तरदार, सयुंक्त राजपूत,

      २.५ गुण

आरव तरफदार,विराज क्षत्रिय,आरूष सप्रे, रुद्रो राघव, पार्थ गावकर,रूद्र साहू

      २ गुण

प्रभास भवर,अविनाश बेंडाळे,रूद्र सर्जेराव

      १.५ गुण

कुमार अयांश,अक्षय प्रभुणे,इदिका गुळवे,दियारा वाणी 

  अर्जुन  कुर्डूकर 

........….............................

फोटो ओळ

फोटो क्रमांक १

पुण्यातील वारजे येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राजे castle chess अकॅडमी व बलराज चेस अकॅडमी द्वारा आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना राष्ट्रीय  बुद्धिबळ खेळाडू प्रकाश देशपांडे,शेजारी अनिल दत्त राजे,विलास मोघे, अर्चना राजे

फोटो क्रमांक २

प्रथम पारितोषिक विजेता राघव पावडे ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांचेकडून ट्रॉफी स्वीकारताना,शेजारी अनिल दत्त राजे.

फोटो क्रमांक ३

नॉन medalist ग्रुप मध्ये प्रथम पारितोषिक वैदिक भावसार,ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांचेकडून पुरस्कार स्वीकारताना

शेजारी अनिल दत्त राजे


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती