रोहित शर्माचे पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कर्णधारपदाचे प्रदर्शन ; वेळ आणि गरजेनुसार गोलंदाजांचा वापर , भारताचा थरारक विजय !
xtreme2day
10-06-2024 18:28:41
7244094
रोहित शर्माचे पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कर्णधारपदाचे प्रदर्शन ; वेळ आणि गरजेनुसार गोलंदाजांचा वापर , भारताचा थरारक विजय !
मुबंई (क्रीडा प्रतिनिधी) - रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कर्णधारपदाचे प्रदर्शन केले. त्याने वेळ आणि गरजेनुसार गोलंदाजांचा वापर केला, ज्यामुळे भारताचा थरारक विजय झाला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला पराभूत करून आश्चर्यकारक कामगिरी केली. सध्या सर्वत्र फक्त टीम इंडियाचीच चर्चा होत आहे. भारतीय संघाने पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.
न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर बाबर आझमने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. यानंतर बाबरच्या गोलंदाजांनी भारताच्या दिग्गज फलंदाजांना १९ षटकात अवघ्या ११९ धावांत गारद केले. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना त्यांचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते.
पण भारतीय गोलंदाजांनी तसे होऊ दिले नाही. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांचा राहिला, दोघांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांनी हातातून गेलेला सामना परत आणला.
भारतासाठी पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे एव्हरेस्टवर चढाई करण्याइतकेच अवघड होते, पण रोहित शर्माच्या काही निर्णयांनी टीम इंडियाच्या झोतात हा विजय टाकला.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेकीपूर्वी पाऊस होता, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ आधी गोलंदाजी करणार हे निश्चित होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी चांगलेच त्रस्त केले, त्यामुळे भारताला १९ षटकांत ११९ धावांपर्यंत मजल मारता आली. येथून भारताचा पराभव जवळपास निश्चित वाटत होता, मात्र कर्णधार रोहित शर्माने काही चतुरस्र निर्णय घेत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांनी रोहितच्या निर्णयांचे पूर्ण पालन केले.
पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखर जमान हा मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. फखर येताच त्याने फिरकीपटू अक्षर पटेलला लांब षटकार मारला. फखरला फिरकीपटूंना कसे खेळायचे हे चांगले माहीत आहे. पण जोपर्यंत फखर क्रीजवर राहिला तोपर्यंत रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांना आक्रमणावर ठेवले. याचा परिणाम हार्दिक पांड्याने फखरला बाउन्सरवर बाद केले. रोहितची ही चाल एकदम परफेक्ट होती. फखर हा असा फलंदाज होता जो सामना २-३ षटके लवकर संपवू शकला असता. भारत-पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, जिथे वेगवान गोलंदाजांना खूप मदत झाली. खेळपट्टी लक्षात घेऊन, रोहित शर्माने ३ मुख्य वेगवान गोलंदाज (बुमराह, सिराज आणि अर्शदीप) यांच्यांसह हार्दिक पांड्याला ४ षटके टाकायला दिली. हार्दिकही बऱ्यापैकी यशस्वी ठरला. त्याने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले. उर्वरित २-२ षटके जडेजा आणि अक्षरने टाकली.
या धावांचा पाठलाग करताना १९वे षटक खूप महत्त्वाचे आहे. सामना कोण जिंकणार हे १९व्या षटकात जवळपास निश्चित झालेले असते. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या महत्त्वपूर्ण षटकासाठी आपला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वाचवून ठेवले होते. बुमराहने १९वे षटक टाकले, ज्यात त्याने फक्त ३ धावा दिल्या आणि त्याने १ विकेटही घेतली.
बुमराह जेव्हा १९ वे षटक टाकायला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी २ षटकात २१ धावांची गरज होती. पण फक्त ३ धावांचं ओव्हर टाकल्यामुळे बुमराहने भारताला मॅच जवळजवळ मिळवून दिली कारण तिथल्या खेळपट्टीवर शेवटच्या षटकात १८ धावा काढणं जवळपास अशक्य होतं. त्यानंतर अर्शदीपने २० वे षटक टाकले, ज्यामध्ये त्याने ११ धावा दिल्या. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या डावातील शेवटचे आणि २०वे षटक टाकले. पाकिस्तानला विजयासाठी १८ धावांची गरज होती. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर इमाद वसीम बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर नसीम शाहने एकेरी घेतली. शाहीन आफ्रिदीने तिसऱ्या चेंडूवर लेग बायच्या रुपात एक धाव घेतली. यानंतर नसीम शाहने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार ठोकले. शेवटच्या चेंडूवर नसीमला एकच धाव घेता आली. अशाप्रकारे अर्शदीपने शेवटच्या षटकात केवळ ११ धावा दिल्या आणि टीम इंडियाने ६ धावांनी विजय मिळवला.
टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. खरं तर ९ जूनच्या रात्री भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांसह संपूर्ण क्रिकेट जगताने जे पाहिले, जे अनुभवले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. भारतीय संघाने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. ११९ धावांत ऑलआऊट झाल्यानंतरही भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ धावांनी धुव्वा उडवला.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.