भारताचा टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर; रोहित शर्माच कर्णधार, हार्दिक पंड्याकडे दिली उपकर्णधार पदाची जबाबदारी
xtreme2day
30-04-2024 17:06:57
2786667
भारताचा टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर; रोहित शर्माच कर्णधार, हार्दिक पंड्याकडे दिली उपकर्णधार पदाची जबाबदारी
नवी दिल्ली (क्रीडा प्रतिनिधी) - टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा आता करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या निवड समितीने रोहित शर्मावर विश्वास कायम ठेवला असून त्याच्याकडेच कर्णधारपद ठेवले आहे. त्याचबरोबर काही धक्कादायक निर्णय यावेळी भारताच्या निवड समितीने घेतले आहेत. हार्दिक पंड्याची टी-२० वर्ल्ड कपसाठी निवड होणार का, याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला आता निवड समितीने पूर्ण विराम दिला आहे. हार्दिककडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
आयपीएल संपल्यावर लगेचंच टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे टी-२० चे सामन्यांचे आयोजन होत आहे. या संदर्भात राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात अनौपचारिक बैठक झाली होती. या बैठकीनंतर भारताचा संघ जाहीर करण्यात आला. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्यात काही नावांवर एकमत झाले नव्हते. आयसीआयने संघ जाहीर करण्यासाठी १ मेपर्यंतची वेळ दिली होती. त्यामुळे शनिवारी झालेल्या मुंबईविरूद्ध दिल्लीच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत संवाद साधण्यासाठी आगरकर थेट दिल्लीला पोहोचले होते. विकेटकीपर म्हणून संघात ऋषभ पंत सोबत संजू सॅमसन याला संधी देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेला वर्ल्डपकची लॉटरी लागली आहे.
भारताचा टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.