Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्रिकेट

टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगची एंट्री, भारताच्या शिलेदाराकडे ब्रँड अँबेसिडर पदवीची सर्वात मोठी जबाबदारी

xtreme2day   27-04-2024 22:56:20   979093

टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगची एंट्री, भारताच्या शिलेदाराकडे ब्रँड अँबेसिडर पदाची सर्वात मोठी जबाबदारी

 

नवी दिल्ली (क्रीडा प्रतिनिधी) - टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगची एंट्री झाली असून,  भारताच्या शिलेदाराकडे सर्वात मोठी जबाबदारी देण्यात आली असून ब्रँड अँम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे.

 

सध्याच्या घडीला टी-२० विश्वचषकाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता भारताच्या संघात कोणाला संधी मिळणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण यामध्येच आता युवराज सिंगची टी-२० विश्वचषकात एंट्री झाल्याचे समोर आले आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेला फक्त ३६ दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्याआधीच आयसीसीने युवराज सिंगला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे ब्रॅंड अँम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. युवराज सिंगने म्हटले की, टी-२० विश्वचषक स्पर्धेत एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारण्याचा विक्रम आणि अशा चांगल्या आठवणी असल्यामुळेच या गोष्टीचा भाग बनण्यासाठी मी उत्सुक आहे.
 
आयपीएल समाप्त होण्याच्या काही दिवसानंतरच आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ चे आयोजन केले जाणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडीज या देशांनी १ जून ते २९ जून दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सामन्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. आता आयसीसीने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला ब्रॅंड अँम्बेसिडर बनविले आहे. युवराजने २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक सामन्यात एका षटकात ६ षटकार मारत वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. तसेच २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
युवराजने असेही म्हटले की, "टी-२० वर्ल्डकपशी संबंधित काही चांगल्या आठवणी माझ्या मनात आहेत, ज्यात एका षटकात ६ षटकार मारणे यांचा समावेश आहे. त्यामुळे याचा भाग बनण्यासाठी मी उत्सुक आहे. हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे आयोजन असेल त्यामुळे टी-२० विश्वचषकाचा एक भाग बनणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे." युवराजने पुढे असेही म्हटले की, "या वर्षी न्यूयॉर्कमध्ये भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. जगातील सर्वात मोठा खेळ हा असणार त्यामुळे याचा भाग बनणे व जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना एका नव्या स्टेडियमवर खेळताना बघणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे."


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती