xtreme2day 07-02-2024 09:23:54 2135926
बीडच्या सचिन धसची अप्रतिम खेळी ; टीम इंडियाला फायनलमध्ये प्रवेश करण्यास उपयुक्त ठरली मुंबई (क्रीडा प्रतिनिधी) - बीडच्या सचिन धस याच्या बॅटिंगसमोर दक्षिण आफ्रिका ठस झाली. सचिनने टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान दिलं. सचिन धस याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भूमिका बजावली. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकारासह 96 धावा केल्या. सचिनने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सचिनने गिअर बदलत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने सचिन शतकाजवळ पोहचून शतक करु शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला. टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियचा विजय निश्चित केला. टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून दूर आहे. सेमी फायनलमधील दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. हा महाअंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.