IPL Auction 2024 : आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर लागली इतिहासातील सर्वात मोठी बोली...
मुंबई (क्रीडा प्रतिनिधी) - मंगळवारी (दि.19) झालेल्या आयपीएल लिलावात विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला लिलावात 20.50 कोटी रुपये मिळाल्यानंतर लगेचच त्याचा सहकारी गोलंदाज मिचेल स्टार्क हा 24.75 कोटी रुपयांमध्ये आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
केकेआर-गुजरातमध्ये स्टार्कसाठी लढत
मिचेल स्टार्कसाठी प्रथम दिल्ली आणि मुंबई यांच्यात स्पर्धा सुरू झाले. दोन्ही संघ थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. स्टार्कला अखेर मुंबई इंडियन्स 7.20 कोटींना विकत घेणार होते पण दिल्ली पुन्हा बोलीत आली. कोलकाताने आता 9.60 कोटी रुपयांवर उडी घेतली. मुंबईच्या बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्स बोलीत आले. दोन्ही संघांकडे सुमारे 31 कोटी रुपये होते आणि लवकरच बोली 20 कोटी रुपयांच्या पुढे गेली.
त्यानंतर स्टार्कने पॅट कमिन्सची 20.5 कोटी रुपयांची बोली मागे पडली. दोघेही हार मानायला तयार नव्हते. गुजरात टायटन्स आक्रमक असताना केकेआर विचारपूर्वक बोली लावत होता. मात्र 24.75 कोटी रुपये गेल्यानंतर गुजरात टायटन्सने माघार घेतली. अशाप्रकारे मिचेल स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून केकेआरचा भाग बनला.
खेळाडूंवर पैशांचा पाऊस
इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर पैशांचा वर्षाव झाला आहे. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनरायडर्स हैदराबादने 20 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केले आहे. कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दुबईत सुरू असलेल्या आयपीएल लिलावात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना खरेदी केले. याशिवाय दुबईत आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने भारतीय मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलला 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
कोणाला किती रक्कम मिळाली?
अजमतुल्लाह उमरजई- 50 लाख रुपये (गुजरात टाइटंस)
ट्रस्टन स्टब्स - 50 लाख रुपये (दिल्ली कैपिटल्स)
केएस भारत- 50 लाख रुपये (केकेआर)
चेतन सकारिया- 50 लाख (केकेआर)
वानिंदु हसारंगा- 1.50 कोटी रुपये (सनराइजर्स हैदराबाद)
जयदेव उनादकट- 1.60 करोड़ रुपये (सनराइजर्स हैदराबाद)
रचिन रवींद्र- 1.80 कोटी (चेन्नई)
हैरी ब्रूक- 4 कोटी रुपये (दिल्ली कैपिटल्स)
शार्दुल ठाकुर- 4 कोटी रुपये (चेन्नई)
क्रिस वोक्स- 4.20 कोटी रुपये (पंजाब किंग्स)
दिलशान मदुशंका- 4.60 करोड़ (मुंबई इंडियंस)
गेराल्ड कोएत्जी- 5 करोड़ रुपये (मुंबई इंडियंस)
उमेश यादव- 5.80 कोटी रुपये (गुजरात टाइटंस)
शिवम मावी- 6.40 कोटी रुपये (लखनऊ सुपर जायंट्स)
ट्रेविस हेड- 6.80 कोटी रुपये (सनराइजर्स हैदराबाद)
रोवमैन पॉवेल- 7.40 कोटी रुपये (राजस्थान रॉयल्स)
अल्जारी जोसेफ- 11.50 कोटी (आरसीबी)
हर्षल पटेल- 11.75 कोटी रुपये (पंजाब किंग्स)
डैरिल मिचेल- 14 कोटी रुपये (चेन्नई सुपर किंग्स)
पैट कमिंस- 20.50 कोटी रुपये (सनराइजर्स हैदराबाद)
मिचेल स्टार्क- 24.75 कोटी रुपये (केकेआर)
अनसोल्ड राहिलेले खेळाडू
स्टीव स्मिथ
करुण नायर
मनीष पांडे
जोश हेजलवुड
तबरेज शम्सी
मुजीब उर रहमान
अकील हुसैन
ईश सोढ़ी
आदिल रशीद
रीली रॉसो
फिल साल्ट
कुसल मेंडिस
लॉकी फर्ग्यूसन
वकार सलामखिल
जोश इंग्लिस