135 कोटींचा महाघोटाळा, ईडीचा कारवाईचा धडाका, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा
Xtreme Today
18-09-2026 20:37:36
275317114
135 कोटींचा महाघोटाळा, ईडीचा कारवाईचा धडाका, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा
छत्रपती संभाजी नगर (विशेष प्रतिनिधी) - छत्रपती संभाजीनगरमध्ये 135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई समोर आली आहे. गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपी’ आणि तिच्या भागीदारांशी संबंधित मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील 6 निवासी आणि व्यावसायिक ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची BMW कार आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसंच इंडियन बँकेच्या सिंगापूर शाखेतील सुमारे 35.71 कोटी रुपयांची मुदत ठेव गोठवण्यात आली आहे.
बँकेच्या तक्रारीनंतर CBI ने 2 जून 2023 रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर CBI च्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू केला. बँकांकडून घेतलेला कर्जनिधी ठरवून दिलेल्या व्यवसायासाठी न वापरता बनावट आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसंच या निधीतून रोख रक्कम काढून पैशांचा मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न झाल्याचंही ईडीने म्हटलं आहे.
दरम्यान अंमलबाजवणी संचालनालयाने चंदीगड, हैदराबाद आणि पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर कारवाई केली. ईडी आणि अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसकडून ही कारवाई करण्यात आली. ईडी आणि अमेरिकेतील सीक्रेट सर्व्हिसने ही कारवाई केली आहे. हैदराबाद आणि पुण्यातील चार बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला आहे. तर हैदराबादमध्ये बनावट डॉलर वाटपाचं रॅकेटही आढळून आलं. पुण्यातही हाच प्रकार समोर आला.
पटियालामधील दोन आणि पुण्यातील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दापाश
पटियाला, पुणे आणि चंदीगडमध्ये ईडीने धडक कारवाई केल्याने सायबर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. पटियालामधील दोन आणि पुण्यातील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दापाश झाला. ईडीने छापा घातला, तेव्हा इथे 220 जण काम करत होते. अमेरिकन नागरिकांना खोटी कारणे देत फसवण्यात येत होते. त्यांची लूट करण्यात येत होती असे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी ईडीने 66 मोबाईल, 13 लॅपटॉप, हार्ड डिस्क, इतर उपकरणं, रोकड आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. डॉलर भारतीय रुपयांमध्ये रुपांतरीत करण्यासाठी कोण कोण मदत करत होते याचा तपास सुरू आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पटियाला येथील एका घरातून कॉल सेंटर चालवल्या जात होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.