Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

दिशा सालियन प्रकरणाबाबत राजकीय घडामोडींना वेग; सतिश सालियान यांनी जबाबात आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मौर्या आणि इतरांवर दिशाची बलात्कार करून हत्या केली असा केला आरोप!

Xtreme Today   14-09-2026 19:46:02   316584826

 

दिशा सालियन प्रकरणाबाबत राजकीय घडामोडींना वेग; सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांचेसह इतरांचे नाव नाही! सतिश सालियान यांनी जबाबात आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मौर्या आणि इतरांवर दिशाची बलात्कार करून हत्या केली असा केला आरोप!

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - हायकोर्टात केलेल्या याचिकेलाच एफआयमध्ये बदलण्यात आले असून, सीबीआय या प्रकरणात तपास करणार आहे.  सतिश सालियन यांनी या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तींची नावे जबाबात घेतली आहेत, त्यांचा खरच रोल आहे का याचा तपास आता सीबीआयकडून केला जाणार आहे.  सतिश सालियान यांनी जबाबात आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मौर्या आणि इतरांवर दिशाची बलात्कार करून हत्या केली असा आरोप केला आहे. सतिश सालियान  यांनी नावे घेतलेल्या व्यक्तीच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यावरच सीबीआय पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. ठोस पुरावे मिळाल्यावरच आरोपपत्र दाखल करण्याचे  आदेश या प्रकरणात हायकोर्टाने दिले आहेत.

 

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे.दिशा सालियान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. जून 2020 मध्ये दिशाचा मृत्यू झाला होता. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काही जणांची नावं आहेत. त्यांची चौकशी होईल. दोन दिवसांपूर्वी दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, रोहन रॉय, अभिनेता दिनो मारियो, सूरज पांचोली यांच्यासह आदित्य ठाकरेंचे अंगरक्षक, रेहा चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, माजी पोलीस अधिकारी सचिन वझे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, डीसीपी विशाल ठाकूर यांची नावं यांच्यावर सतीश सालियान यांनी आरोप केला आहे.

 

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे.दिशा सालियान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. जून 2020 मध्ये दिशाचा मृत्यू झाला होता. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काही जणांची नावं आहेत. त्यांची चौकशी होईल. दोन दिवसांपूर्वी दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, रोहन रॉय, अभिनेता दिनो मारियो, सूरज पांचोली यांच्यासह आदित्य ठाकरेंचे अंगरक्षक, रेहा चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, माजी पोलीस अधिकारी सचिन वझे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, डीसीपी विशाल ठाकूर यांची नावं या एफआयआर मध्ये  सध्या तरी नाहीत.

 

दरम्यान, दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी आदित्य ठाकरेंचे वडिल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या कारस्थानात आणि हे प्रकरण दाबण्यासाठी अन्य लोकांचा सुद्धा सहभाग आहे. संबंधित सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या केसशी संबंधित कागदपत्र नष्ट करणं आणि दाबणं असे प्रकार घडले आहेत. जनतेच्या पैशांचा, पोलीस यंत्रणेचा चुकीच्या गोष्टींसाठी आरोपींना वाचवण्यासाठी वापर झाला” असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

 

ज्यांची नावं या एफआयआरमध्ये आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. मालवणी पोलीस स्टेनशशी संबंधित अधिकाऱ्यांची नाव सुद्धा यात आहेत. पोस्टमार्टम मध्ये असलेले डॉक्टर, नर्सेस यांची सुद्धा नावं यात आहेत. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी सीबीआय समोर जबाब नोंदवताना आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांनी कारस्थान रचून हे प्रकरण दाबलं असं त्यांचं म्हणणं होतं. दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्याच याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवलं. दिशा सालियानचा जून 2020 मध्ये मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी तपासात बेजबाबदारपणा केल्याचा आरोप त्यांनी केला.

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती