Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एक मोठे रॅकेट; या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक

Xtreme Today   13-08-2026 21:01:43   24368805

नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एक मोठे रॅकेट; या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक

 

नाशिक (क्राईम रिपोर्टर) - नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एक मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस केले. यादरम्यानच्या कारवाईत पोलिसांनी लाखोंच्या बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटा तयार करण्याचा मोठा कारखाना तिथे सुरू होता. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लृप्तीचा वापर करून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. या नोटा खऱ्या चलनी विशिष्ट केमिकलमध्ये बुडवल्या जात होत्या. हेच नाही तर आरोपींनी 10 लाख रूपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रूपयांच्या बनावट नोटा देण्याचे अमिष दाखवण्यात आले. हा सर्व व्यवहार सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे.

 

त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव येथील एका खासगी बंगल्यात हा बेकायदेशीर कारखाना सुरू होता. छापेमारीवेळी पोलिसांनी नोटा झापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटिंगचे साहित्य, छापलेल्या लाखोंच्या नोटा, केमिकल आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. हे बनावट नोटा झापणारे रॅकेट फक्त राज्यातच नाही तर देशभरात सुरू होते. हा या रॅकेटला धक्का म्हणावा लागेल. या नोटांची शाई दुसऱ्या कागदावर वटवून दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करण्यात आल्या. ज्यावेळी हा व्यवहार सुरू होता, त्यावेळी कोणीही विचार करणार नाही, असा पोलिसांनी थेट छापा टाकला. या प्रकरणात अमरेश्वर आईथा, मच्छिंद्र घनदाट, हिरामण दाते, गोकुळ दाते, दासरी सत्यइ ही घटना करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

 

मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला.पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईने धाबे दणाणली आहेत. नाशिकच्या तळेगाव परिसरातील बंगल्यात इतका मोठा बनावट नोटा छपाईचा कारखाना सुरू होता. मात्र, याबाबत कोणालाही माहिती नव्हती. पोलिसांनी मोठी रोख रक्कम जप्त केली. या कारवाईने धाबे दणाणली आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात नकली नोटांचा व्यवहार होत असतानाच ही कारवाई करण्यात आली. या रॅकेटचे कनेक्शन देशभरात पसरल्याचेही स्पष्ट झाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती