Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

पुण्यात 1 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणात थेट पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग; 2 पोलिसांसह 6 फरार

Xtreme Today   27-07-2026 19:58:33   5371756

पुण्यात 1 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणात थेट पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग; 2 पोलिसांसह 6 फरार

 

पुणे (क्राईम रिपोर्टर) - पुण्यात 1 कोटी रुपयांची रोकड लंपास करण्यासाठी टाकलेल्या दरोड्यात थेट पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारीच दरोडेखोर निघाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या संपूर्ण कटात एका तोतया पत्रकारासह राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली एक महिला पोलीस हवालदार आणि एका पोलीस नाईकाचा थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार आणि त्यांचे शेजारी किरण आपटे यांच्या मध्यस्थीने एका कंपनीला 1 कोटी रुपयांची गरज होती. हर्षवर्धन पवार हे आपल्या कामगारासह 1 कोटी रुपये घेऊन पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील 'हॉटेल ब्रह्मा'जवळ पोहोचले. ते पैशांचे हस्तांतरण करत असतानाच एका दुचाकीवरून दोघे जण आले. त्यांनी गाडी अडवून "आम्ही पोलीस आहोत, तुम्ही दोन नंबरचा माल (बेकायदेशीर पैसे) घेऊन जात आहात," अशी दमदाटी केली.दरोडेखोरांनी पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि हर्षवर्धन यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकली. झटापटीदरम्यान किरण आपटे हे 73 लाख 50 हजार रुपयांनी भरलेली बॅग घेऊन कसेबसे पळाले. उर्वरित पैशांसह दरोडेखोरांनी गाडी चालकाला धमकावत गाडी थेट खेड शिवापूर पोलीस चौकीकडे नेण्यास भाग पाडले. त्याच वेळी खेड शिवापूर चौकीत सुट्टीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम या खाकी गणवेशात उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत पोलीस नाईक अजित मेस्त्री हे देखील होते. या दोघांनी तोतया पत्रकाराची बाजू घेत हर्षवर्धन पवार यांना "तुम्ही 2 नंबरचा धंदा करता, तुम्हाला अटक करू," अशी भीती दाखवून धमकावण्यास सुरुवात केली.

 

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. सुरुवातीला पोलिसांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आली होती. परंतु सखोल तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिला निकम (महिला पोलीस हवालदार, राजगड पोलीस ठाणे)

अजित इरफू मेस्री (पोलीस नाईक, राजगड पोलीस ठाणे) आशिया दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहेत. दरम्यान, या दरोड्याच्या कटात मुख्य भूमिका बजावणाऱ्या आशिष तिवारी या तोतया पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 10 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, गुन्ह्यात सामील असलेली महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्री यांच्यासह 6 आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा तीव्रतेने शोध घेत आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती