Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

पुण्यात एका निवृत्त व्यावसायिकाला चक्क 12 कोटी रुपयांहून अधिकचा गंडा; व्हॉट्सॲपवरच्या 'त्या' एका मेसेजनं आजोबांना केलं कंगाल

xtreme2day   09-04-2026 21:53:55   2830684

पुण्यात एका निवृत्त व्यावसायिकाला चक्क 12 कोटी रुपयांहून अधिकचा गंडा; व्हॉट्सॲपवरच्या 'त्या' एका मेसेजनं आजोबांना केलं कंगाल

 

पुणे (क्राईम रिपोर्टर) - शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली पुण्यात एका निवृत्त व्यावसायिकाला चक्क 12 कोटी रुपयांहून अधिकचा गंडा घातला गेला आहे. अवघ्या 11 दिवसांत कोट्यधीश होण्याचं स्वप्न दाखवून या भामट्यांनी 75 वर्षांच्या आजोबांना कसं कंगाल केलं गेल. 

 

 

पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या या वयोवृद्ध आजोबांना जानेवारी महिन्यात एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि घरबसल्या लाखो रुपये कमवा, अशा आशयाचा तो मेसेज होता. सुरुवातीला कुतूहल म्हणून प्रतिसाद दिला, पण त्यांना कल्पनाही नव्हती की हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर जाळ्याचा भाग आहे. या चोरट्यांनी हळूहळू संवाद वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला.  आजोबांचा विश्वास बसल्यानंतर चोरट्यांनी त्यांना VIP Stock 24 नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले. या ग्रुपमध्ये अनेक बनावट आकडे आणि गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट रोज शेअर केले जात होते. ग्रुपमधील इतर सदस्य (जे प्रत्यक्षात टोळीचेच लोक होते) आपल्याला कसा फायदा होत आहे, हे सांगून आजोबांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत होते. या खोट्या वातावरणाला बळी पडून त्यांनी आपली पुंजी लावण्यास सुरुवात केली.

 

 

सायबर गुन्हेगारांनी या निवृत्त व्यावसायिकाला एक अशी योजना सांगितली, ज्यात अवघ्या 11 दिवसांत तब्बल 54 कोटी रुपयांचा परतावा मिळणार होता. इतक्या मोठ्या रकमेच्या आमिषाला बळी पडून त्यांनी मागील 3 महिन्यांच्या काळात चोरट्यांनी सांगितलेल्या 8 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर केले. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने एकूण 12 कोटी 31 लाख रुपये या आजोबांनी चोरट्यांच्या हवाली केले. परतावा मिळण्याची वेळ आली, तेव्हा चोरट्यांनी पुन्हा नवनवीन कारणे सांगून अधिक पैशांची मागणी सुरू केली. आपली मूळ रक्कमही परत मिळत नसल्याचे पाहून आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सध्या पुणे पोलीस या व्यवहारांचा आणि संशयास्पद बँक खात्यांचा तपास करत आहेत. गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या या वाढत्या फसवणुकीमुळे पोलिसांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे. कोणत्याही अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुपमधील सल्ल्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका. शेअर बाजारासाठी नेहमी सेबी नोंदणीकृत अधिकृत ब्रोकरचाच वापर करा. जर कोणी कमी वेळात अफाट नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत असेल, तर तो सायबर सापळा असू शकतो हे ओळखा. फसवणूक झाल्यास विलंब न करता 1930 या क्रमांकावर तातडीने कळवा असे आवाहन करण्यात आले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
💹 Payment 36,824.15 USDC ⇨ graph.org/Transfer-04-13-6?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 💹 15-04-2026 20:58:44

kd21n3

xtreme2day.com
💵 + 36,824.44 $ 🔥➤ graph.org/Coinbase-04-13?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 💵 17-04-2026 09:13:53

g0z44l

xtreme2day.com
💶 The balance is 36,824.44 $$. Get 🟢➤ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 💶 23-04-2026 04:40:30

t62qv0

xtreme2day.com
💼 The balance is 36,829.04 $. Get 🔥🔥🔥 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-6?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 💼 11-05-2026 02:23:20

18wvlc

xtreme2day.com
💰 36,824.51 $ withdraw. Get 👉👉 graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-4?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 💰 14-05-2026 07:08:40

5qj2on

xtreme2day.com
📉 Get the transfer of 36,824.56 US Dollars. Next 🔴▶ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21-5?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 📉 16-05-2026 18:56:58

4ltas6

xtreme2day.com
💶 The balance is 36,824.44 $. Sign In ⚡➤ graph.org/BALANCE-3682444-USD-04-21?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 💶 21-05-2026 03:36:10

xi2huj

xtreme2day.com
🏦 TRC20-USDT Crypto Refund 2026 Withdraw Compensation 💥💥 telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 🏦 22-05-2026 09:25:06

7p00fd

xtreme2day.com
🏦 Get the transfer of 36,824.76 US Dollars. Next ➴ graph.org/Transfer-04-14-3?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 🏦 15-04-2026 12:23:13

pzwd4a

xtreme2day.com
💴 TRON Bonus Recovery Available Today 📩📩 telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=35b2df607d108fd1c385c00eb94c4735& 💴 15-05-2026 21:01:00

z6lvgo


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती