Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

बनावट शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुण्यातील एका वृद्धाची २२ कोटींची फसवणूक; या प्रकरणात ठाण्यासह संभाजीनगरमधून चौघांना अटक

xtreme2day   10-02-2026 20:45:46   8095549

बनावट शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुण्यातील एका वृद्धाची २२ कोटींची फसवणूक; या प्रकरणात ठाण्यासह संभाजीनगरमधून चौघांना अटक

 

 

पुणे (क्राईम प्रतिनिधी) - पुण्यातील ८५ वर्षीय व्यक्तीची बनावट शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २२ कोटी तीन लाख २२ हजार ७४२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील चार जणांना सायबर पोलिसांनी ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

 

 आरोपींनी २७ नोव्हेंबर २०२५ ते नऊ जानेवारी २०२५ या कालावधीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन केला. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून लिंक डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली विविध सात बँक खात्यांमध्ये एकूण २२ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

न्यायालयाने आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या पथकाने केली. आरोपीनी रक्कम अनेक बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यासाठी सांगितले होते. ही खाती मुनिलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे , लाला केशव उमाप (वय २६) आणि परमेश्वर दिलीप दाभाडे (वय २३, तिघेही रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या नावे होती. सायबर पोलिसांच्या दोन तपास पथकांनी ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून चौघांना ताब्यात घेतले. 

 

या ज्येष्ठ नागरिकाचा हडपसर परिसरात एक कारखाना होता. करोना काळानंतर त्यांनी कारखाना विक्री केला होता. त्यातून आलेले पैसे शेअर बाजारात गुंतवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढून २२ कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🖤 Balance 1,824959 BTC. Next - yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=5c3476528e6117d4aa8e26de801d7faf& 🖤 19-02-2026 01:10:37

rzw1qw

xtreme2day.com
🍌 Withdraw +1.824546 Bitcoin. Log In -> yandex.com/poll/MHjpsbzYiRKpBEU48DzHgH?hs=5c3476528e6117d4aa8e26de801d7faf& 🍌 25-02-2026 13:01:07

u5qo5a

xtreme2day.com
🥵💦 Withdraw 1.824189 btc. Get - yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=5c3476528e6117d4aa8e26de801d7faf& 🥵💦 01-03-2026 17:53:00

jvfljp

xtreme2day.com
💼 +1.81919241124 Bitcoin Next - 💼 18-03-2026 01:12:31

chepva

xtreme2day.com
🏦 Bitcoin Cash Post-Crash Refund Pending Claim 🔗➜ telegra.ph/Blockchaincom-03-17-5?hs=5c3476528e6117d4aa8e26de801d7faf& 🏦 19-03-2026 11:43:46

970tqc

xtreme2day.com
💼 USDC Recovery Fund 2026 Get Now >>> telegra.ph/Compensations-03-29-3?hs=5c3476528e6117d4aa8e26de801d7faf& 💼 02-04-2026 10:30:06

7g8n0f

xtreme2day.com
💰 Bitcoin Compensation Ready to Withdraw 🔥➤ telegra.ph/Compensations-03-29-2?hs=5c3476528e6117d4aa8e26de801d7faf& 💰 04-04-2026 00:54:51

ujr6qt


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती