Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

1000 कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश 877 जणांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

xtreme2day   22-11-2025 19:21:11   194785358

1000 कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश 877 जणांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - दिल्ली पोलिसांनी सायबर फसवणुकीचे जाळे उद्ध्वस्त केले आहे. गेले ४८ तास चालवलेल्या ‘ऑपरेशन सायहॉक’ या मोठ्या मोहिमेत पोलिसांनी चार हजार ४००हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यापैकी ८७७ जणांना अटक किंवा बाँडवर सोडले आहे. ही माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. राष्ट्रीय सायबर गुन्हा नोंदणी पोर्टलवर आलेल्या तीन हजार ७०० हून अधिक तक्रारी या कारवाईदरम्यान उघडकीस आलेल्या म्यूल अकाउंट्स आणि संशयित मोबाइल क्रमांकांशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

 केंद्रीय गृहमंत्रालयातील भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आयफोरसी) यांच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात आली. यात राजधानी नवी दिल्लीत कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक रॅकेट्स, म्यूल अकाउंट्स, रोख रक्कम काढणारे एजंट आणि बेकायदा कॉल सेंटर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली. ‘ही कारवाई म्हणजे सायबर गुन्हे घडल्यानंतरच्या प्रतिक्रियेऐवजी गुन्ह्यांचे जाळे आधीच उद्ध्वस्त करण्याचा महत्त्वाच्या टप्पा आहे,’ असे पोलिसांनी सांगितले.

 

 

या तपासात एक हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे आर्थिक व्यवहार आढळले आहेत. हे पैसे दिल्लीतील संघटित सायबर सिंडिकेट्सकडून चालवल्या जाणाऱ्या म्यूल अकाउंट्समधून फिरवल्याचा संशय आहे,’ असे संयुक्त पोलिस आयुक्त (इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) रजनीश गुप्ता यांनी सांगितले. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत ३६० नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आणि १६० प्रकरणांमध्ये महत्त्वाची प्रगती झाली. ऑपरेशन सायहॉकदरम्यान नोकरीच्या आमिषाने फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, ग्राहकसेवा प्रतिनिधींचे रूप धारण करणे, टेक-सपोर्ट फसवणूक अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वापरली जाणारी बेकायदा कॉल सेंटर्सही उद्ध्वस्त करण्यात आली. मोबाइल फोन, लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, सिम कार्डे, आर्थिक नोंदी आणि इतर महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांनी जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे. ही सर्वांत मोठी कारवाई मानली जाते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती