xtreme2day 25-07-2025 16:46:15 4765508
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा सुळसुळाट ; चाळीसगाव पोलिसांना सापडलं 50 कोटींचे घबाड ! जळगांव (क्राईम रिपोर्टर) - राज्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा सुळसुळाट आढळून आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात महामार्ग पोलिसांनी ४० ते ५० कोटी रुपयांचे ३९ किलो अँफेटामाईन ड्रग्ज जप्त केले आहे. दिल्लीहून बंगळुरू जाणाऱ्या कारमधून हे ड्रग्ज सापडले. आरोपी सराईत ड्रग्ज तस्कर असून, या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत आहे. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या छापेमारीत ठिकठिकाणी लाखो, कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज मिळत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगावातून सुमारे ४० ते ५० कोटी रुपये किमतीचे ३९ किलो ॲम्फेटामाईन नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जळगावातील महामार्ग पोलिसांनी बोढरे फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जळगावातील महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्याजवळ नाकाबंदी लावली होती. यावेळी दिल्लीहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एका ब्रेझा कारला महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्याजवळ तपासणीसाठी थांबवले. त्यावेळी कारची कसून तपासणी करण्यात आली आहे. यावेळी गाडीच्या विविध भागांमध्ये अत्यंत घातक असलेला ॲम्फेटामाईन हा अंमली पदार्थ लपवलेल्या आढळून आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत ४० ते ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कार चालकाला ताब्यात घेतले असून, वाहनही जप्त करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात यापूर्वीही एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हा आरोपी सराईत ड्रग्ज तस्कर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली.
i1d1o6
igeck3
5ahuj1
1rvr0f
6p35cr
4se0u6
wl6km3