Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 क्राईम न्यूज

डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात 9 जणांना जन्मठेप, देशातील पहिली कारवाई!

xtreme2day   19-07-2025 18:19:14   54670879

डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात 9 जणांना जन्मठेप, देशातील पहिली कारवाई!

 

मुबंई (क्राईम रिपोर्टर) - पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील न्यायालयाने शुक्रवारी सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात नऊ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सायबर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली ही देशातील पहिलीच केस आहे.  या नऊ दोषींना महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमधून अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक महिला देखील आहे.

 

 

सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, नऊ जणांच्या या सायबर चोरट्यांच्या टोळीने गेल्या वर्षी राणाघाट येथील एका रहिवाशाला 'डिजिटल अरेस्ट'ची (Digital Arrest) धमकी देऊन 1 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या सर्व आरोपींना महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमधून अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक महिला देखील आहे. हे सर्व एका मोठ्या सायबर टोळीचा भाग आहेत, ज्यांनी आतापर्यंत देशभरातील 108 लोकांची एकूण 100 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या सर्वांवर देशाच्या इतर भागातही खटला चालवता येणार आहे. 

 

 

कल्याणीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुबर्ती सरकार यांनी गुरुवारी सर्व नऊ आरोपींना दोषी ठरवले होते. शुक्रवारी त्यांनी भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 338 (कागदपत्रांची खोटी माहिती) सह BNS आणि IT कायद्याच्या एकूण 11 कलमांखाली सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. असे गुन्हे 'आर्थिक दहशतवाद'पेक्षा कमी नाहीत या सरकारी वकिलांच्या युक्तिवादाशी न्यायालयाने सहमती दर्शवली. याबाबत बचाव पक्षाने  या निकालाला कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान देतील, असं म्हटलं आहे. 

 

 

सीआयडीचे आयजीपी अखिलेश कुमार चतुर्वेदी म्हणाले की, या सायबर गुन्हेगारांना डिजिटल पुराव्यांच्या आधारे पकडण्यात आले.  तपासात असे दिसून आले की फसवणूक करणारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेल्या बँक खात्यांद्वारे पैसे ट्रान्सफर करत होते. छापेमारीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बँक पासबुक, एटीएम कार्ड, सिम कार्ड आणि मोबाईल फोन जप्त केले. खाती आणि मोबाईल नंबरचे विश्लेषण करून संपूर्ण नेटवर्क उघडकीस आले. पाच महिन्यांच्या खटल्यादरम्यान, चार राज्यांतील 29 साक्षीदारांनी न्यायालयात येऊन जबाब दिले. यामध्ये अंधेरी (पश्चिम) पोलिस ठाण्याचे एसएचओ आणि एसबीआय, पीएनबी, कॅनरा बँक, बंधन बँक, फेडरल बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक यांचा समावेश होता. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र 2600 पानांचे होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
📭 📊 Balance Notification - 1.1 Bitcoin detected. Complete reception >> https://graph.org/ACCESS-CRYPTO-REWARDS-07-23?hs=3c82181526084d518138d4954a915a1d& 📭 12-08-2025 04:56:13

o3mw2y


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती