xtreme2day 27-02-2025 17:12:54 6742255
तीन विद्यार्थिनींनी पुस्तकांमध्ये लपवली 3.47 कोटींची कॅश; पुणे एअरपोर्टवर खळबळ पुणे (क्राईम रिपोर्टर) - पुणे एअरपोर्टवर तीन विद्यार्थिनींच्या पुस्तकात तब्बल 4 लाख डॉलर जप्त करण्यात आले आहेत. म्हणजे तब्बल साडेतीन कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या विद्यार्थिनीं दुबईला जात असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कस्टम अधिकाऱ्यांना संशय आहे की,ही विदेशी रक्कम दुबईला नेण्यात येत होती. 20 वर्षीय तीन विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणात पुण्यातील ट्रॅव्हल एजंट खुशबू अग्रवाल आणि मुंबईचे पॉरेक्स ट्रेडरला अटक करण्यात आली होती. ट्रॅव्हल एजंटने या विद्यार्थिनींची दुबईची तिकिट बुक केलं होतं. तीन विद्यार्थिनी नोटबुकमध्ये लपवून मोठ्या प्रमाणात परकीय चलन तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसून आल्यामुळे दुबईत पोहोचल्यानंतर, भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून, तिन्ही विद्यार्थिनींना भारतात परत पाठवण्यात आले. 17 फेब्रुवारी रोजी दुबईहून पुण्याला येणाऱ्या या तीन विद्यार्थ्यांना पुणे विमानतळावर रोखण्यात आले. एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) च्या अधिकाऱ्यांनी त्यांची कसून तपासणी केली. शोध दरम्यान, त्यांना तब्बत 3.47 कोटी रुपयांसह पकडले. या विद्यार्थिनींच्या बॅगांमध्ये असलेल्या अनेक नोटबुकच्या पानांमध्ये 100 डॉलरच्या नोटा लपवल्या होत्या. असे कस्टम विभागाच्या अधिकारी असलेल्या व्यक्तीने सांगितले.
9dwqb9