xtreme2day 27-01-2025 19:28:39 17865416
कोट्यवधी रुपयांची हेराफेरी : टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळ अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! पुणे (क्राईम रिपोर्टर) - मुंबई-पुण्यातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टोरेसची मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाझला पोलिसांनी पुण्याजवळ अटक केली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या घोटाळ्यातील अनेक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई व आसपासच्या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद तौसिफ रियाज हाच या प्रकरणातील व्हिसलब्लोअर अर्थात प्रकरणाला वाचा फोडणारा व्यक्ती असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता.
zf6mlh
aepkx3
euulqk