xtreme2day 17-10-2024 22:41:51 4327274
11 वर्षाच्या मुलावर 9 अल्पवयीन मुलांचा अनैसर्गिक अत्याचार, या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाला फुटली वाचा अहिल्यादेवी नगर (क्राईम रिपोर्टर) - जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील 11 वर्षीय मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. विशेष म्हणजे या घटनेत अत्याचार करणारे 9 जण ही अल्पवयीन आहेत. या घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयीत आरोपींची चौकशी केली जात आहे. मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात हा घृणास्पद प्रकार घडला आहे. इथे एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलासोबत हे घृणास्पद कृत्य करणारे देखील अल्पवयीनच आहेत. या सर्वांनी मिळून त्या मुलावर सामुहीक अत्याचार केले आहेत. या आधी ते या 11 वर्षाच्या मुलाला सतत धमकावत होते. त्याला भिती दाखवून हे अत्याचार केले आहेत. अत्याचार झाल्यानंतर हा मुलगा सतत तणावाखाली राहात होता. शिवाय तो घाबरलेलाही दिसत होता. मुलाच्या वागण्यात झालेला बदल पालकांना दिसून आला. त्यांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली. सुरूवातीला त्याने काही सांगितले नाही. त्याला तशी धमकी देण्यात आली होती. मात्र पालकांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने त्याच्या बरोबर झालेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. नवंरात्रीत हा सर्व प्रकार घडल्याचे समोर येत आहे. ही गोष्ट पालकांना समजताच ते हादरून गेले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने आपल्या मुलाला घेवून श्रीरामपूरचे पोलिस स्टेशन गाठले. या अत्याचारप्रकरणी पीडित मुलाच्या आईने श्रीरामपुरात शहर पोलीसात फिर्यादी दाखल केली आहे. त्यानुसार संशयित आरोपींची चौकशी सुरु असल्याचं पोलिस निरिक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले आहे. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
w3yo89
x3derk