धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ; या सिनेमानं आत्तापर्यंत केली 900 कोटींपेक्षा जास्त कमाई! धुरंधर II सीक्वल 19 मार्च 2026 मध्ये रिलीज होणार
xtreme2day
27-12-2025 19:38:49
85628136
धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ; या सिनेमानं आत्तापर्यंत केली 900 कोटींपेक्षा जास्त कमाई! धुरंधर II सीक्वल 19 मार्च 2026 मध्ये रिलीज होणार
मुंबई ( चित्रपट प्रतिनिधी) - धुरंधर हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. या सिनेमानं आत्तापर्यंत जगभरात 900 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. डायरेक्टर आदित्य धरने धुरंधर रिलीज होताच त्याच्या सीक्वलची घोषणा करून चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं होतं. आता या सीक्वलबाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे. धुरंधर 2 हा सिनेमा 19 मार्च 2026 मध्ये रिलीज होणार आहे.
धुरंधर हा सिनेमा 140 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. आदित्य धरने या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा तब्बल 214 मिनिटांचा आहे, त्यामुळे हा भारतातील सर्वात लांब सिनेमांपैकी एक ठरला आहे. या सिनेमाचे ओटीटी राईट्स नेटफ्लिक्सने 130 कोटी रुपयांना विकत घेतले असून जानेवारी 2026 पर्यंत हा सिनेमा ओटीटीवर पाहता येईल.
धुरंधर 2 ची स्टोरी पहिल्या पार्टच्या क्लायमॅक्सपासून पुढे नेली जाणार आहे. आता दुसऱ्या भागात हमजाचा पुढचा टार्गेट हा बडे साहब उर्फ इकबाल असेल, असं मानलं जातंय. हा तोच इकबाल आहे ज्याने 26/11 सह भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला होता. पहिल्या भागात रणवीर सिंहने हमजा अली मजारचं कॅरेक्टर प्ले केलं होतं, जो शेवटी जसकिरत सिंह रंगी असल्याचं उघड होतं. तो भारताचा एक सीक्रेट एजंट असतो आणि पाकिस्तानमध्ये एका गुप्त मिशनवर गेलेला असतो. रणवीर सिंग स्टारर चित्रपट ‘धुरंधर' बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला असून दिवसेंदिवस अनेक विक्रम मोडत आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शीत या चित्रपटाचा स्पाय थ्रिलर कराचीच्या ल्यारी टाऊनमधील गँग्सवर आधारित आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधून येणाऱ्या कमेंट्सवरून हे स्पष्ट होते की, तिकडच्या लोकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. कारण यात चित्रपटात त्यांच्या देशाचा किंवा मुस्लीम समाजाचा अपमान केला नाही.नवीन यांनी म्हटलंय, “पाकिस्तानी प्रेक्षकांनी हे लक्षात घेतले आहे की चित्रपटात आम्ही तिथल्या लोकांना किंवा मुस्लिम कम्युनिटीला शिवीगाळ केलेली नाही.आम्ही फक्त त्या भ्रष्ट लोकांना दाखवले आहे,जे सिस्टीमचा गैरफायदा घेतात आणि भारतावर हल्ल्यासारखी परिस्थिती निर्माण करतात.” त्यांनी पुढे सांगितले की पाकिस्तानी प्रेक्षक मान्य करत आहेत की,असे लोक त्यांच्या देशालाही नुकसान पोहोचवत आहेत. म्हणूनच ते चित्रपटाला पसंती दर्शवत आहेत.
या दुसऱ्या भागात रणवीरची भूमिका अधिक पॉवरफुल असणार आहे. धुरंधर 2 ची सुरुवात हमजा दिवंगत रहमानची गादी सांभाळण्यापासून होईल. तो पाकिस्तानच्या राजकारणात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून समोर येईल. तसेच हमजाच्या बॅक स्टोरीवर जास्त फोकस केला जाणार आहे. जसकिरतचा प्रवास कसा झाला आणि त्याने धुरंधर मिशनचं नेतृत्व कसं केलं, हे सगळं या भागात पाहायला मिळेल.
धुरंधर 2 च्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण पहिल्या भागातील बहुतेक कलाकार यात पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. रणवीर सिंहसोबतच आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन, मानव गोहिल आणि दानिश पंडोर हे कलाकार असू शकतात. मात्र, दुसऱ्या भागात प्रेक्षक अक्षय खन्नाला मिस करू शकतात, कारण त्याचं रहमान डकैत हे पात्र आता संपलं आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.