Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

'बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या रिंकू राजगुरू च्या ‘आशा’ चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर

xtreme2day   20-11-2025 20:35:43   4638653

'बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या रिंकू राजगुरू च्या ‘आशा’  चित्रपट प्रदर्शनाची तारीख  जाहीर

 

मुंबई (चित्रपट प्रतिनिधी) - 'बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

 

 

आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू . या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. 

 

 

अभिनेत्री रिंकूने साकारलेली 'आशा' ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. 

 

 ‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल, अशी खात्री आहे.’’ असे दिग्दर्शक दिपक पाटील म्हणाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती