Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

निळ्या डोळ्यांच्या 'मनमोहिनी' भारतीय मनिका विश्वकर्मा झाली "मिस युनिव्हर्स इंडिया २०२५"

xtreme2day   19-08-2025 19:28:00   28734751

निळ्या डोळ्यांच्या 'मनमोहिनी' भारतीय मनिका विश्वकर्मा झाली "मिस युनिव्हर्स इंडिया २०२५"

 

जयपूर (सांस्कृतिक प्रतिनिधी) - योग्य मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाने कोणताही स्वप्न साकार करता येते असा विचार देणारी निळ्या डोळ्यांच्या 'मनमोहिनी' मनिका विश्वकर्मा यंदाची "मिस युनिव्हर्स इंडिया २०२५"  झाली. जयपूरमध्ये आयोजित मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ स्पर्धेत मनिका विश्वकर्माने विजेतेपद मिळवले. साधेपणा आणि आत्मविश्वासाने भारलेल्या मनिकाच्या डोळ्यांनी आणि हास्याने ज्यूरीचे मन जिंकले, आणि आता ती भारतातील सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेच्या मुकुटावर पोहोचली .

 

मनिका विश्वकर्माची कहाणी प्रेरणादायी आहे. एका लहान शहरातून आलेल्या या मुलीने घरापासून ४०८ किमी दूर राहून कठोर मेहनत केली आणि आपले स्वप्न साकार केले. मिस इंडिया युनिव्हर्स या स्पर्धेसाठी तयारी करणे सोपे नाही. मनिकाने फिटनेस, कॅटवॉक, फॅशन सेंस आणि संवाद कौशल्य यावर अविरत मेहनत केली, ज्यामुळे ती इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती