xtreme2day 27-07-2025 20:00:59 16540550
रोमँटिक ऍक्शन सैयारा :अहान पांडे - अनीत पड्डा यांचा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक ३०० कोटींचा गल्ला ! मुंबई (चित्रपट प्रतिनिधी) - तरुण पिढीला आवडणारे अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या रोमँटिक-ॲक्शन ड्रामा 'सैयारा' ने आपल्या नवव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करताना ३०० कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय गल्ला जमवला आहे. हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा पदार्पण करणाऱ्या कलाकारांचा चित्रपट ठरला आहे. चित्रपट समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी चित्रपटाच्या संगीत, अभिनय आणि दिग्दर्शनाचे भरभरून कौतुक केले आहे. सोशल मीडियावरही 'सैयारा' ट्रेंडमध्ये आहे आणि यामुळेच तिकिट खिडकीवर कमाईचा जोर कायम आहे. केवळ भारतातुन २०० कोटींची कमाई या चित्रपटाची असून परदेशात १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजे बॉक्स ऑफिसवर ९ दिवसांत ३०० कोटी पार करणारा पहिलाच पदार्पण चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची यशस्वी वाटचाल पाहता, पुढील काही दिवसांत 'सैयारा' आणखी नवे विक्रम प्रस्थापित करू शकतो.
1u584w