xtreme2day 20-07-2025 18:16:47 87347195
भारत-चीन सीमेवर घडलेल्या सत्य घटनांवर आधारित 'बॅटल ऑफ गलवान' मध्ये सलमान खानची हीरोइन म्हणून चित्रांगदा सिंग मुंबई (चित्रपट प्रतिनिधी) - भारत-चीन सीमेवर घडलेल्या सत्य घटनांवर आधारित या सिनेमामध्ये सलमान खान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटामध्ये चित्रांगदा सिंगच्या झालेल्या एण्ट्रीबाबत दिग्दर्शक अपूर्व लाखियाने आनंद व्यक्त करत म्हटलंय की, तिच्यातील कौशल्य आणि स्क्रीन प्रेझेन्स या सिनेमातील भूमिकेसाठी अगदी साजेसा आहे. अपूर्व लाखियाने असेही म्हटलं की, "'हज़ारों ख़्वाहिशें ऐसी' आणि 'बॉब बिस्वास' हे सिनेमे पाहिल्यानंतर मला चित्रांगदासोबत काम करण्याची इच्छा होती. मला खूप आनंद आहे की ती 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचा भाग आहे. ती स्वतःच्या व्यक्तीरेखेमध्ये वेगळेपण आणते. ज्यामुळे सलमान सरांच्या गंभीर पण शांत व्यक्तिमत्त्वाशी तिच्या व्यक्तीरेखेचा ताळमेळ बसेल". सूत्रांच्या माहितीनुसार, दिग्दर्शक अपूर्व लाखिया अशा चेहऱ्यांच्या शोधामध्ये होते जे संघर्ष, भावना, मृदुता या गोष्टी एकत्र दाखवू शकतील आणि चित्रांगदा सिंगने हे सर्व गुण सहजतेने साकारले आहेत. सूत्रांनी सांगितले की, इंडिया गेटवर काढलेले चित्रांगदाचे काही फोटो पाहून लाखिया विशेषतः प्रभावित झाले. तिच्यातील गंभीर अभिनय शैलीमुळे तिची सिनेमातील भूमिकेसाठी निवड परिपूर्ण ठरली आहे. 'बॅटल ऑफ गलवान' हा सिनेमा यंदाचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमांपैकी एक आहे. केवळ दमदार विषयामुळेच नाही तर नव्या चेहऱ्यांमुळे देखील हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमामध्ये सलमान खान आणि चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत असल्याने प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झालीय. सिनेमाचे शुटिंग वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.
ec9sbt