xtreme2day 18-12-2024 23:05:43 1456769
रायगडची अभिनेत्री प्रियांका झेमसे आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली ! अलिबाग (डॉ. जयपाल पाटील यांजकडून) - रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील अभिनेत्री प्रियंका झेमसे हिने शिवानी मेहरा या दिग्दर्शकाने "मी राणी" या लघुपटात उत्कृष्ट काम केल्याने बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिवल युके 2024 मध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव झळकावले आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.ती मूळची पेणची असून शिक्षणासाठी पनवेल येथे राहते, तिची आई प्रसिद्ध समाजसेविका, पेण नगरपालिकेच्या माजी नगरसेविका, आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर कार्यरत असलेल्या एडवोकेट शुभांगी झेमसे यांची कन्या होय. मुळात तिला लहानपणा पासून अभिनयाची जाण असल्याने तिचे आई वडील हे वकील क्षेत्रात कार्यरत असल्याने कलेच्या प्रशिक्षणासाठी नामांकित लोकांकडे तिने धडे घेतले होते. शिवानी मेहरा यांनी तिच्यातील गुणवत्ता ओळखून मी राणी लघुपटासाठी तिची निवड केली. या लघुपटात तिने खेड्यातील मुलीची भूमिका निभावली. ग्रामीण भागातील आपल्या मराठी भाषेतील सामाजिक व आर्थिक स्थितीचे चित्रण दाखवण्यात आले असून सेंट फ्रान्सिस को अमेरिका येथे शॉट टीव्हीच्या विशेष प्रदर्शनात योग्य प्रतिसाद मिळाला याबाबत प्रियंका झेमसे म्हणाली या कथेचा आशय मंत्रमुग्ध करणारा आहे आणि आपल्या भाषेतील आपली कलाकृती आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले याचा मला अभिमान आहे या लघुपट्याला ऑस्कर शर्यतीत संधी मिळू शकते, आणि तिचा अभिनय व चेहरा हा बॉलीवुड फिल्म साठी अतिशय उपयुक्त आहे असे जाणकारांचे मत आहे.