xtreme2day 12-12-2024 20:31:14 9768063
2024मधील टॉप 10 भारतीय सिनेमांची यादी ; ब्लॉकबस्टर साऊथ सिनेमाने बॉलिवूडला टाकलं मागे मुबंई (सिनेप्रतिनिधी) - IMDbने 2024मधील देशातील टॉप 10 सिनेमांची यादी प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या वर्षात शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांचा एकही सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला नाही. तरीही वर्ष 2024 हिंदी सिनेमाकरिता चांगले ठरले. तर दुसरीकडे साऊथच्या सिनेमांनी 2024मध्ये बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. टॉप one : अव्वल स्थानी 'कल्कि 2898 एडी' सिनेमा आहे. यामध्ये प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. बॉक्सऑफिसवर या सिनेमाने जबरदस्त कमाई केली. नाग अश्विनने या सिनेमाचे दिग्दर्शन केले. टॉप 2 : दुसऱ्या क्रमांकावर राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा 'स्त्री-2' सिनेमा आहे. दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या 'स्त्री-2' सिनेमाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. सिनेमातील गाणी देखील प्रचंड गाजली. टॉप 3 : तिसऱ्या क्रमांकावर साऊथ सिनेमा 'महाराजा' आहे. विजय सेतुपतीच्या या सिनेमाने जबरदस्त कमाई केलीय. सिनेमाचे दिग्दर्शन नितिलन सामीनाथन यांनी केलं होतं. टॉप 4 : अजय देवगण आणि आर. माधवन यांचा थ्रिलर सिनेमा 'शैतान' यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना आर. माधवन यांचे वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. विकास बहल यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. टॉप 5 : ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा 'फायटर' सिनेमा पाचव्या क्रमांकावर आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ मल्होत्राने केले आहे. टॉप 6 : साऊथ सिनेमा 'मंजुम्मेल बॉइज' यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. ओटीटीवर या सिनेमास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. चिदंबरम एस पोडुवल यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. टॉप 7 : सातव्या क्रमांकावर 'भूल भुलैय्या 3' सिनेमा आहे. बॉक्सऑफिसवर या सिनेमाने शानदार कमाई केलीय. विद्या बालन आणि माधुरी दीक्षितची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमाचे दिग्दर्शक अनीस बज्मी आहेत. टॉप 8 : आठव्या क्रमांकावर 'किल' सिनेमा आहे. निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. टॉप 9 : 'सिंघम अगेन' सिनेमा यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. या सिनेमामध्ये अजय देवगणसह करीना कपूर, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंह यांनीही प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. टॉप 10 : दहाव्या क्रमांकावर किरण रावचा 'लापता लेडीज' सिनेमा आहे, या सिनेमालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.