Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

अल्पवयीन मुलींचे अश्लील सीन; टीव्ही इंडस्ट्रीची क्विन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूरवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

xtreme2day   19-10-2024 19:50:54   7875995

अल्पवयीन मुलींचे अश्लील सीन; टीव्ही इंडस्ट्रीची क्विन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूरवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - टीव्ही मालिका निर्माती एकता कपूर या ना त्या कारणामुळं चर्चेत असते. अनेकदा ती वादातही अडकली आहे. आता पुन्हा एकदा तिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीरिजमधील दृश्यांवर आक्षेप घेत एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमएचबी पोलिस ठाण्यात तक्राररादारानं दिलेल्या तक्रारीनुसार अल्ट बालाजी या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत अल्पवयीन मुलींचे अश्लील सीन्स दाखवण्यात आले होते. हे चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकारात मोडतं. इतकचं नाही तर सीरिजमध्ये सिगारेटचा वापर करताना महापुरुषांच्या फोटोंचा वापर करण्यात आलाय. असे गंभीर आरोप करत एकता आणि शोभा कपूर यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

   एकता कपूर हिनं ओटीटी विश्वात पदार्पण करत मोठी खळबळ उडवून दिली होती. संस्कार सुना, एकत्र कुटुंब मालिकेत दाखवणाऱ्या एकानं ओटीटीवर मात्र अश्लील कटेंटचा मारा केल्याचं दिसून आलं. तिच्या ALT बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अडल्ट कंटेटमुळं अनेकदा वाद निर्माण झालाय. तिला XXX, गंदी बात, रागिनी एमएमएस २, बेकाबू या वेब सीरिजमुळं सुप्रीम कोर्टानंही फटकारलं आहे. आता पुन्हा याच प्रकारामुळं तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.'अल्ट बालाजी'वरील सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींचे अश्लील सीन दाखवल्याचा आरोप होतोय. या आरोपाखाली तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. एकता आणि शोभा कपूर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही एकतानं तिच्या सीरिजमध्ये वादग्रस्त सीन्स दाखवले आहेत. तिच्यावरअसाही आरोप झाला होता की तिनं या अडल्ट वेब सीरिजमधून सैनिकांचा अपमान केला आहे. ट्रिपल एक्स वेब सीरिजच्या सीझन २ मध्ये सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याचा आरोप तिच्यावर झालेला आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
Dr.Sanjay G.Tilwankar 19-10-2024 23:06:58

Very well done.Heartly congratulations

xtreme2day.com
📅 Reminder- Operation №MD01. LOG IN => https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=a111248e035077b8163241f15d9e4230& 📅 11-11-2024 05:22:43

k22fxw

xtreme2day.com
🔑 We send a gift from Binance. Gо tо withdrаwаl =>> out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MzEwMDQ1OTA3OTA3JmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl9lcn 04-12-2024 18:17:52

ahpn6f


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती