Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मनोरंजन

मराठी सिनेसृष्टीतला हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे अनंतात विलीन ; चित्रपटसृष्टीला दुःख

xtreme2day   15-10-2024 17:58:20   4678807

मराठी सिनेसृष्टीतला हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे अनंतात विलीन ; चित्रपटसृष्टीला दुःख 

 

मुंबई (प्रतिनिधी) - चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांचं मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यानंतर आज म्हणजेच मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. दादर येथील स्मशानभूमीत अतुल परचुरे यांचे अत्यंविधी पार पडले. अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण मराठी कलासृष्टी हजर होती. अतुल परचुरे यांना अखेरचा निरोप कलाकारांना अश्रू अनावर झाले. 

 

अतुल परचुरे यांनी बजरबट्टू या नाटकातून बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तेव्हापासून रंगभूमीसोबत एक अतुलनीय असं नातं त्यांचं तयार झालं. त्यानंतर अनेक नाटकं, मालिका, सिनेमे या माध्यमातून अतुल परचुरे यांनी प्रेक्षकांचं अगदी निखळ मनोरंजन केलं. काही महिन्यांपासून अतुल परचुरे हे कर्करोगाशी झुंजत होते. यावर मात करण्याचा प्रयत्न ते करत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर कमबॅकचीही तयारी केली होती. पण रंगभूमीवरचा त्यांचा हा प्रवेश होण्याआधीच ते काळाच्या पडद्याआड गेले.  अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, संजय मोने, सुकन्या मोने, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, उमेश कामत, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री यांसह अनेक कलाकांनी हजेरी लावली. अतुल परचुरे यांना अखेरचा निरोप देताना कलाकारांनाही अश्रू अनावर झाले होते. अतुल परचुरे यांच्या अंत्यसंस्काराला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या.

 

अतुल परचुरे यांनी 'बजरबट्टू' या बालनाट्यातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.  अतुल परचुरे यांनी पु.ल.देशपांडे यांची व्यक्ती आणि वल्ली या नाटकातून अगदी हुबेहुब भूमिका साकारली होती. पण त्याची खरी झाली होती ती, नातीगोती या नाटकामुळे. या नाटकात त्यांनी दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू यांच्यासोबत रंगभूमी गाजवली होती. 'वासूची सासु', 'प्रियतमा', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकांमधल्याही त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. सलाम-ए-इश्क', 'पार्टनर', 'ऑल द बेस्ट: फन बिगिन्स', 'खट्टा मीठा', 'बुढ्ढा होगा तेरा बाप' या हिंदी सिनेमांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकतच त्यांचा अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच त्यांनी होणार सून मी ह्या घरची, भागो मोहन प्यारे, जागो मोहन प्यारे, माझा होशील ना या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांची मोहन प्यारे ही भूमिका तर अगदी लहान मुलांपासून सर्वांना भावली. अशा अभिनयाच्या तेजस्वी ताऱ्याने जगाचा निरोप घेतल्याने मराठी सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
📟 Notification: SENDING 1.82687 bitcoin. Get >> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=56206af0e58d84fc96ef447a54201d26& 📟 11-11-2024 05:22:34

cl8kw1

xtreme2day.com
✏ You have received a message # 733. Go >>> out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MjE4MTE1MTUyODMxJmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl9lcnJvcj1GYWx 04-12-2024 18:17:43

a8cdvk


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती