हो, कर्करोग बरा होऊ शकतो..👌😊 🦀 कर्करोग आणि योग्य आहार !
xtreme2day
05-02-2024 23:22:07
79609
📣 4 फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिनानिमित्त बोलू काही..🦀
🦀 हो, कर्करोग बरा होऊ शकतो..👌😊
🦀 कर्करोग आणि योग्य आहार !
🍅🥝🍉🍇🥒🥦🥬🥕🍎🍒🍌🍍🥦🥬🫐
_🦀 कर्करोग हा एक भयंकर आणि प्राणघातक आजार आहे. अर्थात, कॅन्सरवर अनेक उपचार आहेत परंतु हे जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे योग्य वेळी ओळखून त्यावर यशस्वी उपचार करता येऊ शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. कॅन्सर असो वा इतर कोणताही आजार, प्रत्येकामध्ये सकस आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळेच अनेकांना हे जाणून घ्यायचे असते की कॅन्सर टाळण्यासाठी काय खावे? साहजिकच कोणत्याही आजाराशी लढा देणे, टाळणे किंवा बरे होणे यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. कॅन्सरविरोधी आहार (Anti cancer diet ) घेतल्यास कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.👍😊_
_🦀 कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्क म्हणजे खेकडा. कर्करोगाचे आजार खेकडयाप्रमाणे चिवट, धरले तर सहसा न सोडणारे असतात. तसेच खेकडयाला सर्व दिशांनी अवयव असतात त्याप्रमाणे कर्करोग आजूबाजूला अनेक दिशांनी पसरतो. म्हणूनच कर्करोग हे नाव अगदी समर्पक आहे. पण यापेक्षा जास्त समर्पक शब्द म्हणजे बांडगूळ. बांडगूळ जसे झाडाला खाऊन टाकते तसेच कर्करोगाचे आहे.☹️_
_🦀 कर्करोग हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. याला काही अपवाद आहेत. भारतात दर लाख लोकवस्तीत 100 कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण आहे. पन्नाशी, साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता वाढते. कर्करोग जवळजवळ कोणत्याही अवयवात निर्माण होऊ शकतो. त्वचा, स्नायू, अस्थी, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो. हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्त वा रसावाटे पसरू शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागाशी संबंधित असतात.👏👏👏👏👏_
_🦀 थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३५ टक्के कॅन्सर आहाराशी निगडित असून आहारामध्ये बदल केल्यास तेवढ्या प्रमाणात कॅन्सर कमी करता येऊ शकतो.शरीराला लागणाऱ्या कॅलरीज् या कार्बोहायड्रेट्स, मेद व प्रथिने यापासून मिळतात. मेद किंवा चरबीतून मिळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असले पाहिजे. आहारात चरबीचे प्रमाण जास्त, तेही प्राण्यांच्या चरबीचे असेल तर स्तन, कोलोन, प्रोस्टेट व गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते.आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये, मासे इत्यादी गोष्टी खाण्यास प्राधान्य द्यावे. यामध्ये कॅन्सरजन्य गोष्टींवर मात करणारे अँटीऑक्सिडन्टस्, मिनरल्स, फायबर, पोटॅशियम, कॅरोटिन, व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण कमी असते.शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांपेक्षा आठ टक्के कॅन्सर कमी प्रमाणात आढळतो. त्यामुळे शुद्ध शाकाहारी आहार केव्हाही उत्तम..👌_
🦀 _कॅन्सर म्हणजे कॅन्सल नव्हे.. योग्य व्यायाम, पुरेशी विश्रांती, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य आहार असेल तर नक्कीच आपण निरोगी जीवनशैलीत जगू शकतो..आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करून आणि नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेऊन आपण मोठ्यातला मोठा आजार पळवून लावू शकतो..Stay Safe, Stay happy, be positive..👏👏_
(लेखक प्रमाणित आहार सल्लागार आहेत अधिक माहितीसाठी - सागर अरुणराव झाल्टे(शास्त्री), प्रमाणित आहार सल्लागार, एन.एच.आय, कॅलिफोर्निया, यू. एस. ए 📞 8275680852, 9405969624)
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.