Xtreme Today 07-11-2026 19:52:33 557341956
दुष्काळाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नागपूरच्या लोहारीसावंगा गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळी करणार साजरी! मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दिवाळी निमित्ताने प्रत्येक मंत्र्याने किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत सण साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करणार आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी करणार आहेत. मुख्यमंत्री आज नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा गावात रात्री मुक्कामी राहून शेतकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. यासाठी नागपूरच्या लोहारीसावंगा गावात तयारी सुरू झाली आहे. दुष्काळाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्री दिवाळी साजरी करणार आहेत. गावात मुक्काम करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केलं होतं की, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारला पूर्ण सहानुभूती आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक मंत्र्यानं किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत सण साजरा करावा’. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले होते की, शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थिती आणि विविध नैसर्गिक संकटांना तोंड देत आहे. दिवाळीच्या आनंदात हा शेतकरी कुटुंबाचा सहभाग असला पाहिजे. या संकटकाळातही शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तर मुख्यमंत्र्यांनी याच भावनेतून दिवाळी थेट शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी या उपक्रमाची घोषणा केली होती. मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून अडचणी समजून घ्याव्यात, असे फडणवीसांनी स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.