राज्यात एफडीएकडून आता कारवायांचा वेग वाढवला जाणार; आयुक्त तुकाराम मुंढे यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद
Xtreme Today
29-10-2026 21:25:24
298327323
राज्यात एफडीएकडून आता कारवायांचा वेग वाढवला जाणार; आयुक्त तुकाराम मुंढे यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात एफडीएकडून कारवाईचा धडका सुरू आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. भेसळयुक्त माल पकडण्यात आला आहे, तसेच असा माल विकणाऱ्या लोकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज एफडीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. ब्रांद्रा येथील एफडीएच्या कार्यालयात ही महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे आता आम्ही कारवाईचा वेग वाढवणार आहोत. दिवाळीच्या काळात फराळ, मिठाई, चकली, चिवडा आणि इतर वस्तूंची चौकशी केली जाणार आहे. दिवाळी संपेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
राज्यात एफडीएकडून आता कारवायांचा वेग वाढवला जाणार; आयुक्त तुकाराम मुंढे यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद लोकांपर्यंत चांगलं आणि शुद्ध खाद्य कसं पोहचेल याबाबत आपण आदेश काढले आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर देखील आदेश काढण्यात आले आहेत. फेस्टिव्हल सिजनमध्ये भेसळयुक्त पदार्थ विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंडे यांंनी दिला आहे. दरम्यान दिवाळीचा सण जवळ आला आहे, म्हणून 1057 मसाल्याच्या आस्थापनेवर कारवाई करून चौकशी करण्यात आली आहे. 94 आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. 11963 क्विंटल मसाले व मसालेजन्य पदार्थ जप्त केले आहेत. ज्यामध्ये 19.69 कोटी किमतीचे मसाले आहेत, तर 557 जणांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
नागरिकांना दैनंदिन आहारात मसाले रोज लागतात, फराळात देखील त्याचा वापर केला जातो. गोडाऊन आणि कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे किरकोळ दुकानदारांवर देखील करवाई केली जाईल, तसेच इतर व्यावसायिकांची देखील तपासणी केली जाईल. खाण्याच्या तेलाची देखील लवकरच माहिती दिली जाईल. दिवाळी जवळ आल्याने कारवाईचा वेग वाढेल. फराळ , मिठाई ,चकली ,चिवडा आणि इतर वस्तूंची चौकशी केली जाणार आहे.दिवाळी संपेपर्यंत ही कारवाई शुरु राहणार आहे. सणासुदीच्या काळात आजारांच प्रमाण वाढत. त्यातच एक कारण तारीख निघून गेलेले पदार्थ दर्जाहीन पदार्थ हे देखील त्या मागच कारण असतं, असं यावेळी तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे, दरम्यान आता मुंढे यांच्या या इशाऱ्यानंतर भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.