Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 धडाकेबाज

लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सवात आयुष्मान भारत योजनेबाबत जनजागृती

Xtreme Today   21-09-2026 20:51:31   6072542

लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सवात आयुष्मान भारत योजनेबाबत जनजागृती

 

पुणे (प्रतिनिधी/जिमाका वृत्तसेवा) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड देण्यात येते. या कार्डच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. त्यामुळे पात्र नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कोमल पडवळ यांनी केले.

 

माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत शिवशक्ती तरुण मंडळ, वाघोली येथे आयुष्मान भारत योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. कोमल पडवळ यांनी नागरिकांना योजनेची माहिती देत तिचे महत्त्व स्पष्ट केले.

 

डॉ. पडवळ म्हणाल्या, गरीब व पात्र कुटुंबांना आरोग्यविषयक आर्थिक संरक्षण देणे, गंभीर आजारांवरील रुग्णालयीन उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यास मदत करणे आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा आयुष्मान भारत योजनेचा प्रमुख उद्देश आहे. आर्थिक अडचणींमुळे आवश्यक उपचारांपासून नागरिक वंचित राहू नयेत, यासाठी ही योजना महत्त्वाची आहे.

 

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सरकारी तसेच योजनेत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. उपलब्ध उपचार, सुविधा आणि त्यासाठीची पात्रता योजनेच्या नियमानुसार लागू असते. त्यामुळे उपचार घेण्यापूर्वी संबंधित रुग्णालय योजनेअंतर्गत सूचीबद्ध आहे किंवा नाही, तसेच संबंधित उपचार योजनेत समाविष्ट आहेत किंवा नाहीत, याची अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे.

 

आयुष्मान भारत कार्डमुळे पात्र लाभार्थ्यांना रुग्णालयीन उपचारांसाठी आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होते. योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधांनुसार सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. त्यामुळे गंभीर आजाराच्या उपचारामुळे कुटुंबावर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होते. आवश्यक उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या पात्र कुटुंबांना वेळेवर उपचार मिळावेत, हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश असल्याचेही डॉ. पडवळ यांनी सांगितले.

 

आयुष्मान भारत कार्ड मिळविण्यासाठी योजनेनुसार पात्रता असणे आवश्यक आहे. पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच उपलब्ध उपचार आणि सुविधांबाबतची अधिकृत माहिती तपासूनच नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोषदादा सातव, उपाध्यक्ष नवनाथ शेळके, मंडळाचे इतर सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती