Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 धडाकेबाज

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक ऐतिहासिक घेतला निर्णय; हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी जारी केले नवे आदेश!

xtreme2day   24-06-2026 20:47:21   124480835

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक ऐतिहासिक घेतला निर्णय; हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी जारी केले नवे आदेश!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक परिस्थितीत अन्न तयार करणे, वापरलेला खाद्य तेलाचा परत वापर करणे, वैद्यकीय तपासणी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून अन्न पडताळणी करणं, तापमान नियंत्रणात त्रुटी असणं, अन्न दर्जाहीन साहित्यात अन्न पदार्थाचे पॅकेजिंग करणं, ग्राहकांना सुरक्षित पाण्याचे पाणी उपलब्ध न करुण देणे आणि विविध अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे या गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. या गोष्टी नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे पुन्हा याबाबत आदेश पारित केले आहेत. 

 

 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी जारी केलेल्या नव्या आदेशाविषयी माहिती दिली. तसेच या आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. "मी 23 जूनला एक आदेश पारित केलेला आहे. हे आदेश हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यासाठी आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट यांनी पाळावायाच्या काही गोष्टी बंधनकारक आहेत. आम्ही राबवलेल्या विशेष मोहीम आणि सर्वेक्षणात गंभीर त्रुटी आस्थापनांमध्ये आढळल्या आहेत. हे आदेश सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला लागू होणार आहे. तसेच उपहारगृह, ढाबे, कँटिन, कॅफेटेरिया, बेकरी, मिठाईचे दुकानं, कॅटरिंग युनिट, फूड कॅटरस, जूस बास, विविध प्रकारचे किचनस, साखळी उपहारगृह, ई कॉमर्स आणि इतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी या सर्वांना हा आदेश लागू होईल. जिथे जेवण बनवलं जातं आणि लोकांना खाद्य म्हणून विकलं जातं तिथे हा कायदा लागू होईल", अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

 

 

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागाचे नवीन आदेश असे - 

 

- लायसन्सशिवाय रेस्टॉरंट आणि हॉटेल चालवता येणार नाही.

स्वच्छता आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचं आहे

- कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षण गरजेचं आहे. कारण त्याला काही आजार असेल तर अन्नातून तो आजार पसरु शकतो

- कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणं गरजेचं आहे.

- गरम आणि थंड अन्नासाठी निर्धारित तापमान राखणे गरजेचं आहे.

- परवानाधारक पुरवठाधारकाकडून कच्चा माल खरेदी करणे

- ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देणं बंधनकारक आहे. आमच्याकडे पाणी नाही, बाटलीचं विकत पाणी मिळेल, असं बंधनकारक करता येत नाही. त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

- वापरलेल्या खाद्य तेलाचा परत वापर करता येणार नाही. तेलचा वास यायला लागला, ते काळं दिसायला लागलं तर ते आरोग्यासाठी घातक असतं.

- ऑनलाइन विक्री होणाऱ्या अन्न पदार्थावर प्रत्येक ठिकाणी परवाना क्रमांक लागेल. कॅलरीची माहिती द्यावी लागेल. जेवढे किचन असतील त्या प्रत्येक किचनला वेगवेगळी परवानगी घ्यावी लागेल. मोठ्या कंपन्यांनी दरवर्षी किचनचे ऑडिट करणे आवश्यक आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती