Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 धडाकेबाज

पुणे-मनमाड रेल्वे मार्गावर मोठे बदल; या 308 किमी लांब मार्गांवरील अपग्रेडमुळे प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार!

xtreme2day   29-12-2025 17:46:32   6761066

पुणे-मनमाड रेल्वे मार्गावर मोठे बदल; या 308 किमी लांब मार्गांवरील अपग्रेडमुळे प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार!

 

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे-मनमाड रेल्वे मार्गावर मोठे बदल करण्यात येत आहेत. या 308 किमी लांब मार्गांवरील अपग्रेडमुळे प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. 

 

 

पुणे-मनमाड रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. पुणे-मनमाड पॅसेंजर, एक्सप्रेसला सध्या सुमारे 9 तासांचा वेळ लागतो. मात्र आता रेल्वे प्रशासनाच्या नव्या उपक्रमामुळे हा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. 

 

 

पुणे-मनमाड रेल्वे मार्गाचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उच्च दर्जाचे नवीन रूळ टाकण्याचे काम हाती घेतले आहे. 550 जीएमटी (ग्रॉस मिलियन टन) क्षमतेचे हे नवीन रूळ तब्बल 55 कोटी टन भार सहन करू शकतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान होणार आहे. या मार्गावर प्रवासी वाहतुकीसह मोठ्या प्रमाणावर मालवाहतूकही होते. कोळसा, सिमेंट आणि धान्याची नियमित वाहतूक असल्याने रुळांवर प्रचंड ताण पडतो आणि ते लवकर खराब होतात. याच पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे विभागांतर्गत पुणतांबा आणि कान्हेगाव स्थानकांदरम्यान रुळ बदलण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी या मार्गावर 52 किलो वजनाचे रूळ होते. त्यांच्या जागी आता 60 किलो वजनाचे अधिक भक्कम रूळ बसवले जात आहेत. यामुळे रुळांची वहनक्षमता वाढणार असून, गाड्यांचा कमाल वेग ताशी 110 किमीवरून 130 किमीपर्यंत वाढणार आहे. परिणामी, पुणे-मनमाड प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

 

 

रेल्वे प्रशासन प्लासर क्विक रिलेइंग सिस्टीम (PQRS) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या प्रणालीमुळे नियोजित ट्रॅफिक ब्लॉकमध्येही गाड्यांची वाहतूक सुरू ठेवत, कमी वेळेत काम पूर्ण करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या 35 दिवसांत 9 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील रुळांची यशस्वी बदली करण्यात आली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🔥🍑 Dating for sex. Complete 👉 yandex.com/poll/43o224okZdReGRb1Q8PXXJ?hs=d1dd86c97588f29c9daa7a99180d0dbc& Alert Reminder # ACNK1345686 🔥🍑 03-01-2026 06:44:13

h34jc6


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती