अनंत चतुदर्थीला शासकीय सुट्टी नाही ; पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर
xtreme2day
31-08-2025 20:07:09
1785498
अनंत चतुदर्थीला शासकीय सुट्टी नाही ; पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर
पुणे, दि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) : विभागीय आयुक्त पुणे विभाग डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सन २०२५ या वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी खालील दिवस स्थानिक सुट्ट्या म्हणून जाहीर केल्या आहेत.
या दि. १४ मार्च १९८३ रोजी शासन, सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश करण्यात आला आहे.
सन २०२५ मधील स्थानिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे :
१) सोमवार, दि. ०१ सप्टेंबर २०२५ – गौरीपूजन
२) सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ – घटस्थापना
३) सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ – नरक चतुर्दशी
गणपती उत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरावरील आदेशात दुरुस्ती
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पुणे यांच्या दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रानुसार या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या आदेश क्र. पगक/कावि/२५८/२०२५ दि. १८ ऑगस्ट २०२५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. गणपती उत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतील दिनांक १ सप्टेंबर २०२५, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे.
हा दुरुस्त आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हांडाधिकारी, पुणे श्री. जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.
---

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.