जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाची आढावा बैठक संपन्न
xtreme2day
09-08-2025 21:48:44
7947084
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाची आढावा बैठक संपन्न
पुणे (प्रतिनिधी) - राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्लीचे सह सल्लागार, नवलप्रकाश, वरिष्ठ सल्लागार, कर्नल अनु दयाल माथर, सह सल्लागार विजय लोकेश सिंह हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुणे महानगरपालिके अंतर्गत ICCC (INTEGRATED COMMAND & CONTROL CENTER) याबाबत अद्ययावत करून सुरु असलेल्या कामकाज बावत माहिती दिली. शहर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अद्ययावतीकरण सुरु असून पुढील महिन्यात कार्यान्वित होणार असल्याचे सांगण्यात आले. मान्सून पुर्वी शहर आपत्ती धोके सौम्यीकरण प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या कामाबाबत सादरीकरण केले. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखिल सादरीकरण केले.
पुणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा, आपत्ती सौम्यीकरणाअंतर्गत कामे, तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी उपाययोजना, जिल्ह्यातील सर्व विभागांशी समन्वय, इतर जिल्ह्यांशी समन्वय, जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राची स्थिती, रचना आणि कार्यप्रणाली, आपदा मित्र, आपदा सखी आणि सुरु असलेल्या युवा आपदा मित्र प्रशिक्षण, इत्यादी बाबत माहिती व सादरीकरण केले. तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन सुरु असलेल्या कामकाजबाबत माहिती घेतली. जिल्ह्यात युवा आपदा मित्र प्रशिक्षण ठिकाणी भेट देऊन जिल्ह्यात होत असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम उपस्थित होत्या.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.