Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 बदल्या / नियुक्ती

एअर मार्शल प्रदीप बापट PVSM,VSM (निवृत्त) यांची माजी सैनिक महामंडळाच्या (MESCO) संचालकपदी नियुक्ती

xtreme2day   26-06-2025 17:43:34   1734887

एअर मार्शल प्रदीप बापट PVSM,VSM (निवृत्त) यांची  माजी सैनिक महामंडळाच्या (MESCO) संचालकपदी नियुक्ती

 

पुणे (प्रतिनिधी) - एअर मार्शल प्रदीप बापट, PVSM VSM (निवृत्त) अध्यक्ष  अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद,महाराष्ट्र आणि गोवा यांची महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड (मेस्को) च्या संचालकपदी १८ जून २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मेस्को ही महाराष्ट्र शासनाची उपक्रम संस्था असून, १८ जानेवारी २००२ रोजी तिची स्थापना झालेली आहे.ह्या संस्थेचा मुख्य उद्देश माजी सैनिकांच्या पुनर्वसन व कल्याणासाठी तसेच विविध क्षेत्रांमध्ये त्यांना अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांच्या नियुक्तीमुळे  मेस्को (MESCO) या संस्थेच्या दृष्टीकोनात नवचैतन्य निर्माण होईल, तसेच माजी सैनिकांचे सक्षमीकरण आणि मुख्य प्रवाहात त्यांचा समावेश करण्यावर अधिक भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही संचालक पदाची प्रतिष्ठेची नियुक्ती राज्य शासनाच्या माजी सैनिकांप्रती असलेल्या कटिबद्धतेचे व त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेतील आणि विकासातील योगदानाचे प्रतिक आहे.

एअर मार्शल बापट (निवृत्त), यांना यापूर्वी २६ जानेवारी २०२० रोजी परम विशिष्ट सेवा पदक व २६ जानेवारी २०१४ रोजी विशिष्ट सेवा पदक राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. तसेच २६ एप्रिल २०२२ रोजी त्यांना मध्यप्रदेश रत्न अलंकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे सर्व सदस्यांनी हार्दिक अभिनंदन व गौरवभावना व्यक्त केली आहे.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती