इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज या संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर जेष्ठ पत्रकार व संपादक संजयकुमार जोशी यांची नियुक्ती
xtreme2day
08-03-2025 16:36:56
4037012
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज या संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर जेष्ठ पत्रकार व संपादक संजयकुमार जोशी यांची नियुक्ती
पुणे (विशेष प्रतिनिधी) - गेली तीन दशकं आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि शैक्षणिक गुणवत्ता व कौशल्य विकास यात देशातील विविध संस्थासाठी योजना राबविणाऱ्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज या प्रतिथयश सॉफ्टवेअर कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर जेष्ठ पत्रकार व संपादक संजयकुमार जोशी यांची नियुक्ती झाली आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश छडवेलकर यांनी संजयकुमार जोशी यांना या पदाची सूत्रे हाती देऊन त्यांचे स्वागत केले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजचे नोंदणीकृत मुख्य कार्यालय पुण्यातील औंध परिसरात असून, भारत सरकारने घोषित केलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्रपणे सॉफ्टवेअर निर्मिती करीत आहे. राज्यातील तसेच देशातील विविध शिक्षण संस्था, विद्यापीठ आणि खासगी क्षेत्रातील दिग्गज व्यवस्थापण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आजच्या घडीला सुमारे ११०० हुन अधिक संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज या संस्थेचे सॉफ्टवेअर दैनंदिन व्यवहारात वापरतात आणि त्यामुळे या शैक्षणिक संस्थांचा निर्णय प्रक्रियेत गुणवत्ता व कौशल्य विकास प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.
संजयकुमार जोशी यांना वृत्तपत्र क्षेत्रातील प्रदीर्घ असा ३५ वर्षे नामांकित वृत्तपत्राचा अनुभव आहे. तसेच भारतीय मानक ब्युरो, मिटकॉन, स्टार इन्शुरन्स, एलआयसी, अँम्वे आदी सोबत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एक्सट्रीम मीडिया हाऊस अंतर्गत वेबपोर्टल व युट्यूब चॅनलचे ते संस्थापक आणि संपादक म्हणून कार्यरत आहेत. एक प्रोफेशनल कुशल प्रशासक-व्यवस्थापन, व्यावहारिक विपणन, जनसंपर्क आणि पत्रकारिता तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ अशा प्रकारच्या विविधांगी प्रत्यक्ष अनुभवाचा फायदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज या संस्थेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण राबविताना होईल असा विश्वास वाटतो, असे या संस्थेचे संचालक सचिन नालापुरे यांनी सांगितले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.