Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 मंत्रालय

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे

xtreme2day   29-01-2025 22:43:51   4905727

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे

 

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. 

 

या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय हे अध्यक्ष असतील. तसेच, आरोग्य संचालनालय चे संचालक, आयुष संचालनालयचे संचालक, जेजे हॉस्पिटलचे  अधिष्ठाता यांच्यासह प्रमुख रुग्णालयाचे महत्वाचे अधिकारी या समितीचा भाग असतील. शिवाय मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता सध्या अस्तित्वात असलेल्या 20 आजारांपैकी इतर सरकारी योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांचे पुनर्विलोकन करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय ही समिती सहाय्यता मिळण्याकरिता नवीन आजार  समाविष्ट करण्याबाबत शिफारस करू शकते. रस्ते अपघात वगळून इतर अपघात प्रकरणामध्ये घ्यावयाच्या कागदपत्रांची निश्चिती करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता आजारांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यांच्या रकमांचे पुनर्विलोकन करुन मंजूर रक्कम नव्याने निर्धारीत करण्याची शिफारस करणे यासाठी ही समिती स्थापन झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता रुग्णालय संलग्नीकरणासाठी रुग्णालयाच्या तपासणीचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, केंद्र-राज्य सरकारच्या वैद्यकीय उपचाराबाबत असलेल्या इतर योजनांच्या धर्तीवर निकष ठरविणेबाबत शिफारस करणे याकरिता ही समिती गठीत करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने वैद्यकीय उपचाराबाबत वेळोवेळी विविध विषयांच्या अनुषंगाने विचारणा केल्यास ही समिती त्या विषयांबाबत शिफारस सादर करेल.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
📙 Message: + 0,75532845 BTC. Receive =>> https://telegra.ph/Get-BTC-right-now-01-22?hs=65c076f7a7ac91e49db6621fdaec58e6& 📙 01-02-2025 20:49:58

f7ne56


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती