Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 यश कथा

येवल्यातील प्रियंकाने गाठले २३व्या वर्षी यूपीएससीचे शिखर ; १२ फेल चित्रपटाची प्रेरणा घेऊन यूपीएससीत मिळवलं घवघवीत यश !

xtreme2day   21-04-2024 16:28:45   879677

येवल्यातील प्रियंकाने गाठले २३व्या वर्षी यूपीएससीचे शिखर ; १२ फेल चित्रपटाची प्रेरणा घेऊन यूपीएससीत मिळवलं घवघवीत यश !

 

येवला (प्रतिनिधी) - केवळ वयाच्या २३व्या वर्षात यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या प्रियंका मोहिते तिने अथक प्रयत्न करून दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेला गवसणी घातली आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनपटावर आधारित १२ फेल या चित्रपटाची प्रेरणा घेऊन यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्याचा प्रियंका मोहिते यांनी सांगितले. 

 

५९५ नंबरची रँक मिळवत प्रियंका मोहिते हिने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर प्रियंका मोहिते हिने हे यश आपल्या आई-वडील आणि गुरुजनांना श्रेय देऊन मिळवल्याचं सांगितलं. 
 
दररोज सकाळी वाचन, आणि दिवसभरात सकस आहार घेऊन ऑनलाइन क्लासेस करत अभ्यास केला. आयुष्यात यूपीएससी परीक्षा देण्याची इच्छा मनात आल्यानंतर प्रियांकाने आपले परिश्रम सुरू केले. आयपीएस मनोज शर्मा यांचा१२ फेल हा चित्रपट प्रियांकाने बघितला. या आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनपटावरील १२ फेल या चित्रपटाची प्रेरणा घेऊन यूपीएससी परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. पहिला प्रयत्न हा अयशस्वी ठरला. मात्र अवघ्या २३व्या वर्षातच प्रियांका मोहिते हिने दुसरा प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले.
 
प्रियंका मोहिते ही शिक्षक असलेले सुरेश मोहिते यांची कन्या. वडील शिक्षक असल्यामुळे पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार असणारी प्रियंका यूपीएससी परीक्षेत यश मिळवेल हा विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केला होता. अभ्यासात तिला आई-वडील तसेच गुरुजनांचे देखील मोठे मार्गदर्शन मिळत गेले. पहिल्या परीक्षेत अपयश आल्याने प्रियंका काहीशी नाराज झाली होती. मात्र दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवायचेच असा चंग प्रियंकाने बांधला. त्यानंतर यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नांत तिने आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
 
प्रियंकाची जिद्द आणि चिकाटी या जोरावर प्रियांकाने यश मिळवले असल्याची माहिती तिच्या आई-वडिलांनी दिली. सुरुवातीपासून प्रियंका अभ्यासात हुशार आणि अतिशय चिकाटी दाखवत असल्याने ती नक्कीच यूपीएससी परीक्षेत यश मिळवणार असा विश्वास तिच्या शिक्षकांना होता. मात्र या सर्वांच्या विश्वासाला सार्थ ठरवून प्रियंकाने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. घरची परिस्थिती सामान्य असली तरी, अभ्यासात मात्र प्रियंका ही कधीही काटकसर करायची नाही. वेळेचा योग्य उपयोग करून आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रियंकाने यूपीएससी परीक्षेला गवसणी घातल्यामुळे प्रियंकाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती