Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

काँग्रेस डिलिमिटेशन विधेयकाविरोधात विरोधकांची मोट बांधत असतानाच, शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेने इंडिया आघाडीत मोठी फूट पडणार ! आरजेडी आणि डीएमके पण पाठिंबा भाजपाला देणार

Xtreme Today   27-11-2026 22:17:05   623875090

काँग्रेस डिलिमिटेशन विधेयकाविरोधात विरोधकांची मोट बांधत असतानाच, शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेने इंडिया आघाडीत मोठी फूट पडणार ! आरजेडी आणि डीएमके पण पाठिंबा भाजपाला देणार

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध ठेवण्यासाठी डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देण्याची वेळ आल्याची माहिती शरद पवार यांनी काँग्रेसला दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी म्हटलं आहे. एकीकडे काँग्रेस या विधेयकाविरोधात विरोधकांची मोट बांधत असतानाच शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेने इंडिया आघाडीत मोठी फूट पडणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या डीलिमिटेशन विधेयकाला इंडिया आघाडीतील प्रमुख घटक आरजेडीने पाठिंबा जाहीर केला आहे. लालूंच्या आरजेडीच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच आरजेडीने घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचेही म्हटलं आहे. इंडिया आघाडीमधील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनीच विरोधात भूमिका घेतल्याने आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अशातच आता दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडला संदेश पाठवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदारांची भाजपशी चर्चा झाली असून ते विधेयकाच्या समर्थनात उभे राहणार असल्याचा निरोप शरद पवार यांनी काँग्रेसला दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याबाबत पक्षाची भूमिका मांडली होती. डिलिमिटेशनबाबत शरद पवार यांनी एकदा अनौपचारिक चर्चेत म्हणाले होते की, मतदारसंघ पुनर्रचना गरजेचे असते. डिलिमिटेशन हे घटनात्मक आहे, ते करावे लागते त्याला पर्याय नसतो असे मला साहेब म्हणाले होते. सुप्रिया सुळे यांचीही आठ खासदारांशी याबाबत चर्चा झाली आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय झाला असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मात्र याबाबत निर्णय झाला नसल्याचे म्हटलं आहे. डिलिमिटेशन बिलाची प्रत हातात आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं अमोल कोल्हेंनी म्हटले आहे. 

 

दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सध्या सर्वात चर्चेत असलेले आणि जोरदार विरोध असलेले मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन बील सादर होेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन (सीमांकन) विधेयक आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. अशातच आता मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भातील डिलिमिटेशन विधेयकाची प्रत समोर आली आहे.

 

मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सरकारच्या नव्या उपक्रमाविरोधात विरोधी पक्ष आघाडी उभारण्याची तयारी करत आहेत. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला जाईल. विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळेल, असा भाजपला विश्वास आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या नेत्यांना मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कोणत्याही परिस्थितीत विरोध करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. तर केंद्र सरकारने आणलेल्या डीलिमिटेशन विधेयकाला इंडिया आघाडीतील प्रमुख घटक आरजेडीने पाठिंबा जाहीर केला आहे. लालूंच्या आरजेडीच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच आरजेडीने घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती